१८ पगड जाती आणि बारा बलुतेदारांचा “स्वराज्य” पक्ष राज्याच्या राजकारणातील सक्षम पर्याय – प्रदेश संपर्कप्रमुख करण गायकर : घोटी येथे स्वराज्य पक्ष पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – “स्वराज्य” पक्ष बारा बलुतेदारांचा अठरा पगड जातींचा आहे. स्वराज्याचा ध्वज इगतपुरी तालुक्यातील गावागावात पोहचवून बळकटी निर्माण करा. शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार या पंचसूत्रीवर “स्वराज्य” काम करीत आहे. इगतपुरी तालुक्याला स्वराज्याचा भक्कम बालेकिल्ला बनवण्यासाठी आपण सर्वांनी जीवाचे रान केले पाहिजे. आगामी काळात लोकसभा, विधानसभा यांचे तोरण याच मतदारसंघातून बांधले जाईल याचा ठाम विश्वास वाटतो. “स्वराज्य” आता सक्रिय राजकारणात असून स्वराज्यचा विचार न केल्यास घोटी बाजार समिती निवडणुकीत तिसरा पॅनल निश्चित असल्याचे प्रतिपादन “स्वराज्य”चे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख करण गायकर यांनी केले. घोटी येथील इगतपुरी तालुका पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. स्वराज्यप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्या आदेशाने, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख करण गायकर, जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे, राज्य कोअर कमिटी सदस्य नवनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख आशिष हिरे, उपजिल्हाप्रमुख महेंद्र शिरसाठ, इगतपुरी तालुकाध्यक्ष नारायण भोसले यांच्या नेतृत्वाखाली पदग्रहण सोहळा घोटी येथे पार पडला. समृद्धी, धरणे, रेल्वे, महामार्ग, लष्करी हद्दीसाठी जमिनींचा त्याग करूनही भूमिपुत्रांना काम मिळत नाही. निव्वळ आश्वासनांची खिरापत वाटली जाते. भूमिपुत्रांना नाशिक मनपाच्या भरतीत किमान २० टक्के जागा मिळाव्यात, महाराष्ट्राचे राजकारण पाहता स्वराज्य हा सक्षम पर्याय म्हणुन पुढे येईल असेही करण गायकर यावेळी म्हणाले.

प्रास्ताविक स्वराज्यचे इगतपुरी तालुकाध्यक्ष नारायण भोसले यांनी केले. उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव मामा गोसावी, उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे, कार्यकारिणी सदस्य विजय वाहुळे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरात, किरण डोके, नाशिक जिल्हाप्रमुख आशिष हिरे, पुष्पा जगताप, मनोरमा पाटील, नितीन दातीर, कार्यकर्ते प्रताप जाधव, ज्ञानेश्वर भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. नारायण बाबा जाधव यांची व्यापारी आघाडीचे जिल्हाप्रमुख तर पुष्पा जगताप यांची महिला राज्य कोअर कमिटी सदस्य म्हणून निवड झाली. शेतकरी आघाडी शिवाजी काजळे, व्यापार आघाडी वैभव गावंडे, सहकार आघाडी हरीश कुंदे, महिला आघाडी छाया गोसावी यांचीही निवड करण्यात आली. विविध आघाड्यांचे तालुकाप्रमुख, गटप्रमुख, गणप्रमुख यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी स्वराज्य संघटनेचे पदग्रहण स्वीकारले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  उपजिल्हाप्रमुख डॉ. महेंद्र शिरसाठ, तालुकाप्रमुख नारायण भोसले, नारायण बाबा जाधव, युवा तालुकाप्रमुख गोकुळ धोंगडे, सखाराम गव्हाणे, विद्यार्थी तालुकाप्रमुख ऋतिक जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रताप जाधव, आरोग्य आघाडी तालुकाप्रमुख रोहीदास जाधव, तालुका उपाध्यक्ष सखाराम गव्हाणे, शेतकरी आघाडी शिवाजी गायकर, धामणीचे माजी उपसरपंच गौतम भोसले, उपतालुकाप्रमुख अरुण जुंद्रे, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर भोसले, जालिंदर कार्ले, राजू भोसले, बहिरू भोसले,कैलास सुरुडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील भोर यांनी केले

Similar Posts

error: Content is protected !!