नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु : मतदार नोंदणी करण्यासाठी तहसीलदार अभिजित बारवकर यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – निवडणूक आयोगाने नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या बनविण्याचे काम सुरू झाले असून ३० सप्टेंबरला जाहीर सूचना प्रसिद्ध होईल. १५ व २५ ऑक्टोबरला याद्यांची वर्तमानपत्रात पुनरप्रसिद्धी केली जाईल. दावे व हरकती स्वीकारण्यासाठी २३ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर असा आहे. निकाली काढण्याचा अंतिम दिनांक २५ डिसेंबर आहे. अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती इगतपुरीचे तहसीलदार तथा सहाय्यक पदनिर्देशीत अधिकारी अभिजित बारवकर आणि निवडणूक नायब तहसीलदार वर्षा वाघ यांनी दिली. नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा मिळून शिक्षक मतदारसंघ आहे. विद्यमान प्रतिनिधीचा कार्यकाळ संपत आलेला आहे. माध्यमिक ते विद्यापीठापर्यंतचे शिक्षक मतदार म्हणून नाव नोंदवू शकतात. मात्र, जे शिक्षक नाशिक विभागात किमान तीन वर्षे कार्यरत आहेत, तेच मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. नाशिक विभागातील सर्व तहसीलदार आणि विभागीय अधिकारी यांच्याकडे फार्म १९ द्वारे मतदारनोंदणी करता येईल. शिक्षक मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू झाले असून याबाबत सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २३ नोव्हेंबरला प्रारुप यादी प्रसिद्ध केली जाईल. अधिक माहितीसाठी इगतपुरी तहसीलदार कार्यालयातील निवडणूक शाखेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

  • १६ ऑक्टोबर : वर्तमानपत्रातील नोटिसीची प्रथम पुर्नप्रसिद्धी
  • २५ ऑक्टोबर : द्वितीय पुर्नप्रसिध्दी
  • ६ नोव्हेंबर : नमुना १९/१८ द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याची अंतिम मुदत
  • २० नोव्हेंबर हस्तलिखिते व प्रारुप मतदार याद्यांची छपाई
  • २३ नोव्हेंबर : प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी
  • २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर दावे व हरकती स्वीकारण्याचा काळ
  • २५ डिसेंबर : दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादीची छपाई करणे
  • ३० डिसेंबर : अंतिम मतदार यादी प्रसिद्धी

Similar Posts

error: Content is protected !!