इगतपुरीनामा न्यूज – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली आहे. या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज खेड भैरव येथील महत्वपूर्ण बैठकीत युतीचा निर्णय घेतला. सिद्ध भैरवनाथ मंदिरात ह्यावेळी सर्वांनी एकत्र राहण्यासाठी शपथ घेतली. इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही युती झाली आहे. २१ एप्रिलला उमेदवार निश्चित करून तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण १८ जागा विजयी करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, ज्ञानेश्वर लहाने, सुनील जाधव, भाजप तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, रामदासबाबा मालुंजकर, सुदाम भोर, कचरू पाटील डुकरे, रमेश धांडे, मोहन बऱ्हे, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, सुनील वाजे, हरिश्चंद्र नाठे, तुकाराम सहाणे, भाऊसाहेब खातळे, अशोक सुरुडे, दिनकर सहाणे, संदीप जाधव, बाळा गव्हाणे, दिनकर सहाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स
इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा
संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps