इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व पक्षीय नेते सरसावले आहे. यात युवकांची मोठ्या प्रमाणात शेतकरी संस्थेत इन्ट्री होताना दिसत आहे. तर आजी-माजी आमदार समोरासमोर येत असल्यामुळे ह्या निवडणुकीकडे सर्वाधिक लक्ष लागून आहे. आज अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाजार समिती आवाराला यात्रेचे स्वरूप आले होते. आतापर्यंत २६६ अर्ज विक्री झाले होते. आत्तापर्यंत सोसायटी गटाच्या ११ जागेसाठी १०५ अर्ज दाखल झाले. तर ग्रामपंचायत गटाच्या ४ जागेसाठी ४३ अर्ज, हमाल तोलारी गटाच्या १ जागेसाठी ३ अर्ज आले. तर व्यापारी गट २ जागेसाठी ९ अर्ज आले. आत्तापर्यंत एकूण १५९ अर्ज भरण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स
इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा
संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps
इगतपुरी तालुक्यातील मातबर नेत्यांसह युवकांचेही मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने विद्यमान सताधाऱ्यासह विरोधकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अखेरच्या दिवशी तालुक्यातील मातब्बरांसह प्रतिष्ठित नेत्यांनी अर्ज दाखल झाल्याने बाजार समितीची ही निवडणुक ऐतिहासिक समजली जाणार असल्याची तालुक्यात चर्चा आहे. कधी नव्हे तर सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळींनी आपआपले अर्ज दाखल केले आहे. ५ एप्रिलला छाननी होणार असून माघारीनंतर खऱ्या लढती स्पष्ट होणार आहेत.