इगतपुरीनामा न्युज – २००८ मध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गट युवासेना उपजिल्हाप्रमुख मिथुन राऊत यांच्यावर आणि त्यांचे सहकारी पेठ पंचायत समितीचे माजी सभापती अंबादास चौरे, आमलोण ग्रामपंचायत माजी सरपंच प्रकाश बोरसे, घनशेतचे माजी सरपंच कैलास चौधरी, हरसुलचे माजी सरपंच अशोक लांघे, मुरंबीचे माजी सरपंच अर्जुन मौळे, गावठाचे माजी सरपंच हिरामण […]
इगतपुरीनामा न्यूज – लोकसभेच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्यानंतर काँग्रेसने आता आपला मोर्चा विधानसभेच्या निवडणुकीकडे वळवला आहे. म्हणून महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष व युवा वर्गात लोकप्रिय असलेले उदयोन्मुख नेतृत्व लकी जाधव यांच्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर मतदार संघ पिंजून मतदार संघातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून त्यांचे […]
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा गटसचिव व कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा इगतपुरी तालुक्याचे भूमिपुत्र देवीदास नाठे यांची बिनविरोध निवड झाली आहेत. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभेत ही निवड घोषित करण्यात आली.देविदास नाठे यांचे जिल्ह्यातील सर्व सचिवांकडुन अभिनंदन करण्यात आले. निवड झाल्यानंतर सचिव संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ निकम, मालेगावचे भिला निकम, सिन्नरचे किरण गोसावी, […]
इगतपुरीनामा न्यूज : बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला असून तो मुहूर्त नक्की कोणता असणार याबाबत शनिवारी सविस्तर माहिती मिळणार आहे. निवडणूक आयोगाचे जॉइंट डिरेक्टर (मीडिया) अनुज चांडक यांनी आजच याबाबत एक पत्र प्रसिद्ध केले असून उद्या (शनिवार) दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्या १ जानेवारी २०२४ पर्यंत ज्या युवक युवतीचे वय १८ वर्षे पूर्ण होणार आहेत त्यांची मतदार नोंदणी सुरू आहे. १८ वर्षे पूर्ण होऊनही ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही, त्यांनाही नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी ९ डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे. एप्रिल मे २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होणे अपेक्षित आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज – बेलगाव तऱ्हाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच अशोक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. प्रमिला भरत वारुंगसे यांचा एकमेव अर्ज आल्याने उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, तानाजी आव्हाड, विजय कर्डक यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड बिनविरोध झाली. यावेळी सरपंच अशोक मोरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वारुंगसे, सुवर्णा आव्हाड, बबाबाई […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देण्यासह आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत परिणामकारक ठरणाऱ्या १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसह १७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. १६ ते २० ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ५ नोव्हेंबरला मतदान तर निकाल ६ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी ऑनलाईन तर पोटनिवडणूकीसाठी पारंपरिक […]
इगतपुरीनामा न्यूज – निवडणूक आयोगाने नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या बनविण्याचे काम सुरू झाले असून ३० सप्टेंबरला जाहीर सूचना प्रसिद्ध होईल. १५ व २५ ऑक्टोबरला याद्यांची वर्तमानपत्रात पुनरप्रसिद्धी केली जाईल. दावे व हरकती स्वीकारण्यासाठी २३ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर असा आहे. निकाली काढण्याचा अंतिम दिनांक २५ डिसेंबर […]
इगतपुरीनामा न्यूज : राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै २०२३ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न […]
इगतपुरीनामा न्यूज – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली आहे. या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज खेड भैरव येथील महत्वपूर्ण बैठकीत युतीचा निर्णय घेतला. सिद्ध भैरवनाथ मंदिरात ह्यावेळी सर्वांनी एकत्र राहण्यासाठी शपथ घेतली. इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना […]