इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ पत्नी नांदायला येत नाही या कारणाची कुरापत काढुन जावयाने सासुच्या पोटात कात्री खुपसुन ठार केले तर भांडण सोडवणाऱ्या पत्नी आणि मुलीलाही विळ्याचे वार करून गंभीर जखमी केल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बुद्रुक येथे घडली आहे. झारवड येथील जोशी कंपनी जवळ राहणाऱ्या सासुच्या पोटात जावयाने धारदार कात्री खुपसुन ठार मारल्याची घटना घडली […]
लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा ग्रामीण लोकजीवनात वर्षानुवर्षे अनेक दाहक प्रश्नाशी झुंजणारी अनेक माणसं आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ज्वलंत परिणामांचा अनुभव असणारेही अनेक आहेत. मात्र आयुष्यभर लढा देऊन ह्या प्रश्नांवर उत्तरं शोधणारी व्यक्तिमत्व दुर्मिळ आहेत. याचप्रकारे आयुष्याची ८० वर्ष अनेकानेक आघाड्यांवर लढा देऊन यशाचे सुखद स्वप्न ज्यांनी प्रत्यक्षात साकार केले […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वाढोली सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी विश्राम भाऊराव महाले तर व्हॉइस चेअरमनपदी गणपत महाले यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी माजी चेअरमन रतन महाले, माजी सरपंच रामभाऊ महाले, यशवंत महाले, कचरु महाले, शंकर ढगे, निवृत्ती महाले, प्रेमराज महाले, कारभारी महाले, पंढरी महाले, तुकाराम महाले, सोपान महाले, दशरथ महाले, […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वाढोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये परिवर्तन घडले आहे. प्रस्थापितांना दणका देऊन विविध आघाड्यांवर एकजुटीने काम करत नम्रता पॅनलने चांगलीच बाजी मारली आहे. विरोधी शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व मनोहर महाले, पाराजी महाले, हिरामण भगत आदींनी केले. मात्र सर्वांच्या पदरात पराभव पडला. शनिवारी झालेल्या मतमोजणीमध्ये नम्रता पॅनेलचे १२ […]
तुकाराम रोकडे | इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव शिवारात आज सकाळी अचानक आग लागली. आगीचे रूपांतर मोठ्या तांडवात होऊन मोठ्या प्रमाणात आदिवासी पाड्यापर्यत आग पोहचली. आदिवासी बांधवांच्या तत्परतेने आटोक्यात आली. सुदैवाने पाड्यापर्यंत पोचलेली आग डोक्यावर पाण्याचे हांडे आणून विझवण्यात आदिवासी बांधवांना यश आले. देवगांव परिसरातील श्रीघाट डोंगरवाडीच्या दरम्यान वनविभागाचे आरक्षित जंगल आहे. जंगलातील […]
सुनील बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ सारस्ते ता. त्र्यंबकेश्वर येथील सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी इंजि. विनायक माळेकर तर व्हॉइस चेअरमनपदी प्रकाश भोये यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. यावेळी सोसायटीचे संचालक नारायण महाले, छगन सहारे, अंबादास चौरे, अरविंद कस्तुरे, दिनकर कस्तुरे, मनोहर चौधरी, जयवंत चौधरी, कमल माळेकर, चांगदेव माळेकर उपस्थित होते. माळेकर यांच्या निवडीचे हरसुलच्या माजी […]
सुनील बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ “धन्य धन्य निवृत्ती नाथा” !”काय महिमा वर्णावा आता” !”शिवावतार धरुनी आले ,”।”केले त्रिलोकी पावन”।”समाधी त्र्यंबकशिखरी”।”मागे शोभे ब्रम्हगिरी”। हरिनामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रति पंढरपूर असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी व गर्भगृहातील अन्य देवतांच्या मुर्तींना सुगंधी चंदनाची उटी […]
ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ त्र्यंबकेश्वर तालुक्यात आंबोली विविध विकास कार्यकारी सोसायटी महत्वाची समजली जाते. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या ह्या सोसायटीची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली असून याबाबत विशेष समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जेष्ठ नेते विद्यमान संचालक ॲड. कैलास पाटील, शिवसेना नेते मनोहर मेढे पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अरुण मेढे, शिवसेना […]
ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ आंबोली येथे दुपारच्या सुमारास बबन लक्ष्मण मेढे हे आपल्या शेतात पाणी भरत असताना साधारण एक महिन्याचे बिबट्याचे पिल्लू आढळून आले. पोलीस पाटील ज्ञानेश्वर मेढेपाटील यांनी वनरक्षक नवनाथ गोरे यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वन खात्याचे श्यामराव गायकवाड, नवनाथ गोरे, कैलास महाले तात्काळ जागेवर जाऊन […]
सुनील बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ सातारा जिल्ह्यात सुरू महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचा मल्ल पै. बाळू बोडके याने 86 किलो वजनी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. प्रतिस्पर्धी ऋषिकेश लांडे या पैलवानाचा पराभव करत विजय प्राप्त केला.बाळू बोडके नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वेळुंजे गावचा सुपुत्र आहे. त्याच्या विजयाने जिल्हाभरात त्याचे अभिनंदन केले जात आहे. […]