इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वाढोली सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी विश्राम भाऊराव महाले तर व्हॉइस चेअरमनपदी गणपत महाले यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी माजी चेअरमन रतन महाले, माजी सरपंच रामभाऊ महाले, यशवंत महाले, कचरु महाले, शंकर ढगे, निवृत्ती महाले, प्रेमराज महाले, कारभारी महाले, पंढरी महाले, तुकाराम महाले, सोपान महाले, दशरथ महाले, संतोष महाले, अंकुश राघवण महाले, रोहीदास थेटे, मुरलीधर महाले, रघु महाले, शिवाजी महाले, देविदास बोडके आदी उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू असुन वाढोली येथील सहकारी संस्थेच्या निवडणुकीत नम्रता पॅनलने विरोधी पॅनलचा १२ पैकी १२ जागा जिंकत धुव्वा उडवला होता. चेअरमन व व्हॉइस चेअरमनपदासाठी विशेष सभा आज घेण्यात आली. चेअरमनपदासाठी विश्राम महाले व व्हॉइस चेअरमनपदासाठी गणपत महाले यांचे प्रत्येकी एकच अर्ज विहित वेळेत दाखल करण्यात आले. त्यानुसार सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने या दोनही पदांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व सचिव यांनी घोषित केले. निवडणूक प्रक्रियेप्रसंगी विश्राम भाऊराव महाले, नंदु राधाकृष्ण ठाणगे, भिमा लहानु महाले, गणपत खंडु महाले, रामदास महादू महाले, गोविंद पुंजाजी महाले, राजाराम संतू महाले, भगवंता बहिरु महाले, ज्ञानेश्वर पांडुरंग वाघमारे, दिलीप दामोदर शिंदे, तान्हूबाई कोंडाजी महाले, राधाबाई राघवन महाले आदी उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. नूतन पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली.