त्र्यंबकेश्वर तालुकास्तरीय हिंदुहृदयसम्राट चषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी अटीतटीचा सामना : कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे समाधान बोडके पाटील यांचे आवाहन

वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारीपाडा हरसुल येथे त्र्यंबकेश्वर तालुकास्तरीय हिंदुहृदयसम्राट चषक क्रिकेट स्पर्धा अतिशय दिमाखदार नियोजनात पार पडल्या. अखेरचा अटीतटीचा सेमी फायनल व फायनल सामना उद्या मंगळवारी १ फेब्रुवारीला दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत अटीतटीचा सामना बघायला मिळणार आहे. […]

त्र्यंबकेश्वर तालुक्यात २८ गावांना ४ कोटी १० लाख किमतीच्या पाणी पुरवठा योजना मंजूर : महिलांच्या डोक्यावरील हंडा खांद्यावर आणल्याचे आत्मिक समाधान – आमदार हिरामण खोसकर

ज्ञानेश्वर महाले : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ त्र्यंबकेश्वर तालुक्यात अधिकचा पाऊस पडुन सुध्दा शेकडो वाड्यात पाड्याना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यात गत दोन वर्षात त्र्यंबकेश्वर तालुका टंचाईमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आताही जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतुन तालुक्यात २८ गावांना ४ कोटी १० लाख किमतीच्या पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. महिलांच्या डोक्यावरील हंडा खांद्यावर […]

श्रीघाट ते टाकेदेवगाव रस्त्याचे काम रखडले : कामाच्या संथगतीचा प्रवाशांना फटका

तुकाराम रोकडे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाट –  रायपाडा – टाकेदेवगाव ४.३०० किमी रस्त्याचे काम रखडले असून संथगतीने चालू आहे. सद्यस्थितीत काम बंद अवस्थेत दिसून येत असून फक्त रस्त्याच्या बाजूला खडीचे ढीग टाकलेले दिसत आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतुकीला अडचण निर्माण होत असून रस्त्याचे काम केव्हा पूर्णत्वास जाईल असा […]

पुढील तीन महिन्यात नाशिकच्या वाड्या-पाड्यापर्यंत पाणी पोहचवणार – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे : सावरपाडा व सेंद्रीपाडा यांना जोडणाऱ्या लोखंडी पुलाची पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28 शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करतांना शहरांसोबतच खेडी व वाड्या-पाड्यांचा विकास केला जाईल. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पुढील तीन महिन्यात जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील  वाड्या-पाड्यांपर्यंत पाणी पोहचवणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे राजशिष्टाचार, पर्यावरण, वातावरणीय बदल व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सेंद्रीपाडा येथे केले. आज त्र्यंबकेश्वर येथील दूर्गम भागात लोकसहभागातून साकारलेल्या सावरपाडा व सेंद्रीपाडा यांना […]

संत निवृत्तीनाथांची महापूजा संपन्न : समाधी मंदिराचा २२ कोटी २३ लाख रुपयांचा विकास आराखडा प्रस्तावित –  आमदार हिरामण खोसकर

ज्ञानेश्वर महाले : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ त्र्यंबकेश्वर हे साक्षात कैलास असल्याची अनेक साधु महंत व वारकऱ्यांची भावना आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ हे विश्वगुरु असल्याने त्यांच्या समाधीमुळे त्र्यंबक पावन झाले आहे. ल्या समाधी मंदिराचा सर्वागिण विकास करण्यासाठी कटिबद्ध असून वारकऱ्यांना कायमस्वरूपी पायाभुत सुविधा  देण्यासाठी राज्य सरकारकडे २२ कोटी २३ लाख रुपयाचा विकास आराखडा प्रस्तावित आहे. त्यास […]

खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून शेंद्रीपाडाचा पाणीप्रश्न निघाला निकाली : सौरऊर्जा प्रकल्पाचे खासदार गोडसे यांच्या हस्ते लोकार्पण

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ पाण्यापोटी आदिवासी भागातील महिलांची होणारी पायपीट थांबवण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्रीपाडा येथे उभारलेल्या सोलर डयुअल वॉटर पंपीग प्रकल्पाचे आज खासदार गोडसे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. काही दिवसापूर्वी सोशल मिडीयावर शेंद्रीपाडा येथील गाजलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येची खासदार गोडसे यांनी दखल घेत सोलर डयुअल वॉटर पंपीग […]

खरशेत आणि इतर नऊ पाड्यांना मिळणार आता हक्काचे घरपोच नळाद्वारे पाणी : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी साधला खरशेत ग्रामस्थांशी संवाद

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ घेतली दखल : “हे राज्यातील प्रत्येक नागरिकाचे सरकार असल्याची व्यक्त केली भावना” इगतपुरीनामा न्यूज, दि. 11 “साहेब, आमच्या माय भगिनीची व्यथा तुम्ही जाणली आणि 24 तासांच्या आत पाणी आणण्यासाठी असणारा लोखंडी पूल तयार झाला. जणू आमचा मरणाकडे जाणारा रस्ता थांबला…” अशा  शब्दांत शेंद्रीपाडा.. खरशेतमधील ग्रामस्थांनी आपल्या भावना […]

अखेर शिवसेनेतर्फे खरशेत शेंद्रीपाडा तास नदीवर उभारला पूल : आदिवासी ग्रामस्थांनी मानले शिवसेनेचे आभार

सुनिल बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत ग्रामपंचायत अंतर्गत सावरपाडा येथील पाड्यावरील तास नदीवर ग्रामस्थांसहित महिला वर्ग विद्यार्थी यांचे नदीवरून ये जा करताना मोठी कसरत करावी लागत असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. स्वतंत्र भारतात सामान्य माणसाला अजूनही साध्या गोष्टीसाठी मोठा संघर्ष करावा लागतो. या प्रकरणामुळे जगाच्या लक्षात तरी आले […]

जव्हार फाटा ते वेळुंजे रस्त्याचे काम कासव गतीने : आमदारांच्या सूचनांना केराची टोपली

सुनिल बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ जव्हार फाटा ते वेळुंजे रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याबाबत नेहमीच लोकांमध्ये संताप व्यक्त केला जातो. परंतु संबंधित प्रशासनासह ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याच्या कामाला ग्रहण कायम आहे. जून मध्ये या रस्त्याचे कार्यरंभ आदेश निघून आता सहा महिने पूर्ण होऊनही अद्यापही ह्या रस्त्याचे काम लटकलेले आहे. एक महिन्यापासून जागोजागी खड्डे […]

भारतीय वृत्तपत्रांची परंपरा उज्ज्वल आणि प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ भारतीय वृत्तपत्रांची परंपरा उज्ज्वल आणि प्रेरणादायी आहे. ही परंपरा सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक इतिहासाशी इतकी निगडीत आहे, की वृत्तपत्रांचा इतिहास हा सामाजिक व राजकीय चळवळींचा इतिहास आहे ,असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. सामाजिक जबाबदारी म्हणून महाविद्यालयात विविध उपक्रम राबवून  सामाजिक प्रबोधन करत आहे. त्यामुळे […]

error: Content is protected !!