वन अधिकाऱ्यांसोबत तस्करांची झटापट झाल्याने हवेत गोळीबार ; बिबट्याच्या अवयवाची १७ लाखांत तस्करी करणारे ४ जण अटक : इगतपुरी त्र्यंबकेश्वर वन विभागाच्या संयुक्त कारवाईला यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाने मोठी कामगिरी केली असून बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आज झालेल्या कारवाईमध्ये इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी मोठी कामगिरी केली. वन अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधला. त्या व्यक्तींनी ह्या व्यवहातसाठी 17 लाख रुपयांमध्ये व्यवहार करण्याचे ठरवले. मात्र चार वेळा ह्या व्यक्तींनी ठिकाणे बदलून हूल देण्याचा प्रयत्न केला. अखेर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथे हा व्यवहार करण्यासाठी पथक पोहोचले. यावेळी 17 लाख रुपये बनावट तयार करण्यात आले. यावेळी संबंधित व्यक्तींना संशय आल्याने त्यांनी अधिकाऱ्यांशी झटापट केली. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी हवेत गोळीबार केला. सर्व पथकाने यावेळी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी बिबट्याच्या अवयवाची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटला गजाआड केले आहे. ह्या रॅकेटमध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्ह्यसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील तस्कर असावेत असा संशय आहे. यासह तस्करांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असावे अशी शक्यता वर्तवली जाते आहे. यामुळे इगतपुरीसह नाशिक जिल्ह्यात खळबळ माजली असून वन विभागाच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

हे आहेत अटक केलेले संशयित आरोपी 
प्रकाश लक्ष्मण राऊत वय 43 रा. रांजनवाडा ता. मोखाडा जि. पालघर, परशराम महादू चौधरी वय 30 रा. चिंचतारा ता. मोखाडा जि. पालघर यशवंत हेमा मौळी वय 38, , हेतू हेमा मौळी वय 38दोघे राहणार रा. कुडवा ता. मोखाडा जि. पालघर

तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यासाठी इगतपुरीचे वन परीक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, शैलेश झुटे, पोपट डांगे, सचिन दिवाने, वनरक्षक फैजअली सय्यद, आर. टी. पाठक, मुज्जू शेख, गुव्हाडे, पी. डी. गांगुर्डे, जी. डी. बागुल, विठ्ठल गावंडे, एस. पी. थोरात, सी. डी. गाडर, राहुल घाटेसाव, त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वनक्षेत्रातील वनरक्षक संतोष बोडके वनपरिमंडळ अधिकारी ए. एस. निंबेकर, एम. ए. इनामदार, मधुकर चव्हाण, वनरक्षक एन ए गोरे, के. वाय. दळवी, एस. ए. पवार यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी अन्य संशयित लोकांचा शोध आणि तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. 2018 मध्ये तत्कालीन वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनीही अशीच उल्लेखनीय कामगिरी करून तस्कर ताब्यात घेतले होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!