इगतपुरीनामा न्यूज, दि. 1 त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महत्त्वपूर्ण दलपतपुर ग्रामपंचायतीमध्ये माजी उपसभापती रविंद्र भोये यांच्या नेतृत्वाखाली खंदे समर्थक कु. अंकुश कामडी यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाली. चिखलपाडा, हट्टीपाडा, दलपतपुर येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन उपसरपंच निवडीचा जल्लोष साजरा केला. यावेळी विरोधकांकडे फक्त दोन ग्रामपंचायत सदस्य असल्याने उपसरपंच पदासाठी त्यांनी नामनिर्देशन ही भरले नाही, या बिनविरोध […]
सुनिल बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. 30 त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी ग्रामपंचायत वेळुंजे येथील वॉर्ड क्र. ३ ची जागा बिनविरोध झाल्याने तालुक्यात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. परंपरागत आमने सामने लढत असलेले शिवसेना नेते समाधान बोडके पाटील व राष्ट्रवादी नेते हरिभाऊ बोडके यांची लढत गेल्या 20 वर्षापासून कायमच तालुक्यात चर्चेचा विषय राहिला आहे. परंतु […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 15 गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरी, नाशिक, ननाशी वनपरिक्षेत्राच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करून संयुक्त सापळा रचला. पेठ महामार्गावर ननाशी वनपरिक्षेत्रातील आंबेगण फाट्यावर दोन संशयित मोतीराम महादू खोसकर वय ३५, रा. आडगाव देवळा, ता. त्र्यंबकेश्वर ), सुभाष रामदास गुंबाडे वय ३५, रा. पाटे, ता. पेठ यांना बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी रंगेहाथ ताब्यात घेतले. […]
ज्ञानेश्वर महाले : इगतपुरीनामा न्यूज, दि. 9 प्रदक्षिणा मार्गातील ब्रह्मगिरीवर अवैध उत्खनन झाल्यामुळे धोकादायक बनलेल्या सुपलीची मेट व गंगाव्दार येथे दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांचे व रस्त्याची प्रचंड नुकसान झाले. याबाबत दखल इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी भेट दिली. धार्मिक महत्त्व असलेल्या ब्रम्हगिरीच्या उत्खननामुळे पावसाळ्यात दगडे व दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात सुपलीची […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाने मोठी कामगिरी केली असून बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आज झालेल्या कारवाईमध्ये इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी मोठी कामगिरी केली. वन अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधला. त्या व्यक्तींनी ह्या व्यवहातसाठी 17 लाख रुपयांमध्ये […]
ज्ञानेश्वर महाले : इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात १५० कोटी रुपये खर्चून पिंपळगाव बहुला ते त्र्यंबकेश्वर हा राज्य महामार्ग तयार करण्यात आला. देशातील पहिला ग्रीन हायवे म्हणून त्याची ख्याती असली तरी या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. रस्त्यावर टप्प्या टप्प्याने खड्डे पडलेले असल्याने खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्त्याची दुरवस्था […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा, न्यूज, दि. ३ महत्वाचे : ह्या बातमीची कॉपी करून अन्य माध्यमात प्रसिद्ध केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मागील आठवड्यात आरक्षण काढण्यात आले. ह्यामुळे कुठे धुमारे अन कुठे फवारे असे वातावरण जिल्हाभर निर्माण झाले. विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुद्धा सुरु करून जनसंपर्क वाढवला. आरक्षणामुळे अनेक बड्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पावसाळी हंगामामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करणारे पर्यटन स्थळे आहेत. पर्यटकांची प्रचंड गर्दी मुंबई व नाशिक शहरातुन फार मोठ्या प्रमाणात दोन्ही तालुक्यात शनिवारी व रविवारी गर्दी होत असते. त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना चांगला रोजगार उपलब्ध होत असतो. मात्र पर्यटकांना मज्जाव केल्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. यासह पोलीस […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ सगळीकडे सध्या अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी जास्त प्रमाणात लोकांची गर्दी होत असल्याने अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नाशिक पश्चिम विभागाच्या अधिनस्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने, दुगारवाडी, हरीहर, भास्करगड, अंजनेरी, वाघेरा, इगतपुरी तालुक्यातील भावली, त्रिंगलवाडी, कुरुंगवाडी आदी सर्व गडांवर आणि सर्व पर्यटन स्थळी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इंदिरा काँग्रेस पक्षाची हरसूल येथे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने आढावा बैठक संपन्न झाली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने हरसूल गट व गणावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पंचायत समिती माजी उपसभापती रविंद्र भोये, […]