आगामी निवडणूकांच्या तयारीसाठी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची हरसूल येथे आढावा बैठक : रवींद्र भोये, मिथुन राऊत यांनी केले आयोजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इंदिरा काँग्रेस पक्षाची हरसूल येथे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने आढावा बैठक संपन्न झाली. आगामी  जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने हरसूल गट व गणावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पंचायत समिती माजी उपसभापती रविंद्र भोये, युवा नेते मिथुन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल येथे चर्चासत्र पार पडले. नुकत्याच पार पडलेल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थांचे नवनिर्वाचित चेअरमन, व्हॉइस चेअरमण आणि संचालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, मुख्तार सैय्यद, भारत खोटरे, लक्ष्मण मेघे, एकनाथ वाघेरे, सुभाष मेघे, लक्ष्मण गांगुर्डे, शंकर वाढू, अंबादास बेंडकोळी, निरगुडे सरपंच प्रवीण तुंगार, मोहन भोये, शिवराम पाटील, रामदास भोये, माजी चेअरमन रामदास बोरसे, मुरली बोरसे, दीपक बोरसे, पुंडलिक पाडवी, अशोक राऊत, नितीन राऊत, अशोक कनोजे, यादव गवळी, भगवान लाखन, जनार्दन भोये, विठ्ठल पवार, हिरामण माळगावे, देवराम महाले, मधुकर महाले, रमेश भांगरे, नामदेव भोये, सुरेश झोले, रामचंद्र लिलके, यशवंत धनगर, प्रकाश राऊत, आनंद कावरे यांच्यासह हरसूल पंचायत समिती गणातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!