वाढोली सोसायटीत प्रस्थापितांना नम्रता पॅनलकडून दणका : विरोधी शेतकरी विकास पॅनलच्या झोळीत फक्त भोपळा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वाढोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये परिवर्तन घडले आहे. प्रस्थापितांना दणका देऊन विविध आघाड्यांवर एकजुटीने काम करत  नम्रता पॅनलने चांगलीच बाजी मारली आहे. विरोधी शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व मनोहर महाले, पाराजी महाले, हिरामण भगत आदींनी केले. मात्र सर्वांच्या पदरात पराभव पडला. शनिवारी झालेल्या मतमोजणीमध्ये नम्रता पॅनेलचे १२ संचालक प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. विरोधी शेतकरी विकास पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. सोसायटीची निवडणूक सुरू झाल्यावर गावकऱ्यांनी बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न केला होता मात्र विरोधी पॅनेलच्या काही लोकांनी स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी गावकऱ्यांना जुमानले नाही. परिणामी विरोधकांना माती चाखावी लागली. विजयी नम्रता पॅनेलचे नेतृत्व माजी चेअरमन रतन तात्या महाले, यशवंत महाले यांनी केले. पॅनलच्या विजयासाठी गणपत महाले, कचरु महाले, शंकर ढगे, निवृत्ती महाले, प्रेमराज महाले, कारभारी महाले, पोपट महाले, पंढरी महाले, तुकाराम महाले, रामदास महाले, सोपान महाले, दशरथ महाले, संतोष महाले, अंकुश राघवण महाले, रोहिदास थेटे, मुरलीधर महाले, रघु महाले, शिवाजी महाले, देवीदास बोडके आदींनी केले.

ह्या निवडणुकीत विश्राम भाऊराव महाले, नंदु राधाकृष्ण ठाणगे, भिमा लहानु महाले, गणपत खंडु महाले, रामदास महादू महाले, गोविंद पुंजाजी महाले, राजाराम संतू महाले, भगवंता बहिरु महाले, ज्ञानेश्वर पांडुरंग वाघमारे, दिलीप दामोदर शिंदे, तान्हूबाई कोंडाजी महाले, राधाबाई राघवन महाले हे १२ संचालक प्रचंड मतांनी निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले. वाढोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत विरोधी पॅनलमध्ये मुळेगावचे ३ उमेदवार होते. परंतु नम्रता पॅनलमध्ये एकही उमेदवार मुळेगावचा नसतांना नम्रता पॅनलने तिन्ही मुळेगावच्या उमेदवाराचा पराभव करत धुव्वा उडवला. विजयी पॅनलने विजयाचा जल्लोष केला असून त्र्यंबकेश्वर तालुक्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार निर्मली गावित, जेष्ठ नेते संपतराव सकाळे, बहिरू मुळाणे, विनायक माळेकर, युवराज कोठुळे, निवृत्ती लांबे, दिनकर मोरे, समाधान बोडके, रावसाहेब कोठुळे, संजय मेढे आदीनी पॅनलचे अभिनंदन केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!