
नाशिक रोड ( प्रतिनिधी ) – गेल्या आठ ते दहा वर्षापासून प्रभाग क्रमांक १८ मध्ये सामाजिक कार्यकर्ते योगेश चिंधुजी निसाळ हे आपल्या स्वतःच्या पाणी टँकरच्या माध्यमातून अहोरात्र सेवा देत जनतेची सेवा करत आहेत. ते सध्या नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १८ मधून ड गटातून निवडणूक लढवीत आहेत. अशा उमेदवाराच्या पाठीशी आपण सर्वांनी भक्कमपणे उभे राहावे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफालीताई भुजबळ यांनी जेलरोड येथे केले. प्रभाग क्रमांक १८ मधून सर्वसाधारण गटातून योगेश चिंधुजी निसाळ, महिला सर्वसाधारण गटातून नाशिक रोड देवळाली बँकेचे संचालक अशोक सातभाई यांच्या पत्नी रत्ना अशोक सातभाई, इतर मागासवर्ग प्रवर्ग महिला गटातून वंदना सुरेश बोराडे, अनुसूचित जाती गटातून रोहित (शिवा) अनिल गाडे हे उमेदवारी करत असून सर्व उमेदवार सुशिक्षित सामाजिक प्रश्नांची जाण असणारे व लोकाभिमुख असलेले उमेदवार असल्याचे सांगत अशा उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तुळशीराम बुट्टे महाराज, निवृत्ती महाराज अरिंगळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मान्यवर प्रभागातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान छत्रपती चौक येथून नारळ वाहून शुभारंभ झाला. फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार रॅली काढण्यात आली. यावेळी अजितदादा तुम आगे बढो, भुजबळ साहेब तूम आगे बढो यासह राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो अशा घोषणा देत संपूर्ण प्रभागात शुभारंभ रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीत मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता. जवळपास ५ ते ७ किलोमीटर प्रचार रॅली काढण्यात आली होती. या शोभायात्रेत स्वतः शेफालीताई भुजबळ यांच्यासह सर्व उमेदवार सहभागी झाले होते. महिलांच्या प्रचंड गर्दीने लक्ष केंद्रित झाले होते. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यागत जमा झाल्याची चर्चा मतदारसंघात होती. ठिकठिकाणी शेफालीताई भुजबळ स्वतः महिलांशी चर्चा करून समस्या समजून घेत होत्या. प्रत्येक ठिकाणी महिलावर्ग जो व्यक्ती नगरसेवक असतांना एवढे मोठे काम करू शकतो. तो नगरसेवक झाल्यानंतर केवढे काम करेल असा आशावाद योगेश भाऊ निसाळ यांच्या विषयी प्रत्येक ठिकाणी ऐकू येत होता.
नगरसेवक पद नसतांना योगेश निसाळ यांनी शववाहिनी असेल,उन्हाळ्यात पाणीटंचाई असताना ठिकठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा असेल,वृक्ष लागवड,रक्तदान शिबिर यासह विविध आंदोलन कार्यक्रमांनी आपला परिसर गजबजुन टाकला होता.असे युवा पिढीचे पदाधिकारी पुढे आल्यास प्रभागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी योगेश निसाळ यांच्यासह प्रभागातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी महिला भगिनींनी पुढे यावे – शेफालीताई भुजबळ
