इगतपुरीनामा न्यूज – समृद्धी महामार्गाच्या कामामुळे एक हेक्टर पेरू बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वारंवार प्रयत्न करुनही समृद्धी महामार्गाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. भरपाई न देता फसवणूक करून अन्याय करीत आहेत. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथील पीडित शेतकरी काशिनाथ वाळू शिंदे यांनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – नैसर्गिक शेती या विषयावर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण झाले. कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक व कृषी विज्ञान केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत हे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन कार्यक्रमावेळी आत्माचे […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – बेलगाव कुऱ्हेचे शेतकरी राजू बोराडे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत दहा गुंठ्यात गुलाब शेतीचा प्रयोग यशस्वी केली आहे. दिल्लीत फुल मार्केटमध्ये त्यांच्या गुलाबाला चांगला भाव मिळत आहे. यामधून त्यांना एका वर्षात साडे तीन लाख उत्पन्न मिळाले. ठिबक सिंचन सुविधा असलेले पॉलीहाऊस उभारून त्यांनी हा प्रयोग केला आहे. या शेतीतून […]
इगतपुरीनामा न्यूज – उत्तम शेतीमुळे समाजापुढे आदर्श उभा करणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी व संलग्न क्षेत्रात उत्कृष्ठ कामासाठी आत्मा अंतर्गत विविध पुरस्कार प्रदान करतांना आनंद होत आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामाची ओळख होवून प्रेरणा निर्माण होईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी केले. जिल्हा प्रशासन, जि. […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – वरई, नागलीचे लाडू, चिक्की, भगर, रानातले मध, निरगुडीचे गुणकारी तेल, हातसडीचे तांदूळ नाशिकच्या कृषी महोत्सवात सर्वांचे आकर्षण ठरत आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नाशिक व महिला विकास महामंडळ ( माविम ) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतिगृह मैदान गंगापूर रोड नाशिक येथे आजपासून १४ […]
इगतपुरीनामा न्यूज – शेतीतील नाविन्याचा शोध घेत अनेक शेतकऱ्यांना तळमळीचे पत्रकार लक्ष्मण सोनवणे आधारस्तंभ ठरले. त्यांच्या विविध आदर्श कामांमुळे त्यांना शासनाचा ‘आदर्श कृषी विस्तारक’ पुरस्कार घोषित झाला आहे. १० ते १४ फेब्रुवारीला नाशिकला होणाऱ्या कृषी महोत्सवात पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प संचालक […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नाशिक व महिला विकास महामंडळ ( मविम ) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतिगृह मैदान गंगापूर रोड नाशिक येथे १० ते १४ फेब्रुवारी पर्यंत नाशिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. कृषी महोत्सवात प्रवेश विनामूल्य असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी या […]
इगतपुरीनामा न्यूज – मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे घोटी खुर्द येथील शंकर यशवंत निसरड यांचे घर कोसळले होते. या घटनेत संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य आणि एका म्हशीचा मृत्यू झाला होता. इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन तलाठी, मंडळ अधिकारी यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज शंकर यशवंत निसरड ह्या पीडित शेतकऱ्याला […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील शेतकऱ्यांना पूर्व कल्पना न देताच मुकणे धरणाचे आवर्तन सोडले. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात कापणी करून ठेवलेल्या भाताची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने शेतकरी संकटात आले आहेत. मुकणे धरणाचे शाखाधिकारी विजय ठाकूर यांच्यासह सहकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. मात्र शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांविषयी […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात घोटी खुर्द येथे अवकाळी वादळी पावसामुळे दगड मातीचे बांधकाम असलेले कौलारू घर पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुधाळ म्हैस जागीच ठार झाली असून अनेक पाळीव शेळ्या गंभीर जखमी झाल्या. घरात उभ्या केलेली मोटारसायकल पडलेल्या घरात दाबली गेल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले. घरातील अन्न धान्य, संसारोपयोगी साहित्याचे मोठे […]