इगतपुरी तालुका काँग्रेस पक्षातर्फे इगतपुरीच्या तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी मिळावी. सर्व शेतकऱ्यांसाठी २४ तास अखंड वीज पुरवठा उपलब्ध करुन भारनियमन बंद करावे. इगतपुरी तालुक्याचे प्रमुख पीक असलेल्या भातासह व इतर पिकांना हमीभाव मिळावा. प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई कमी करावी, नवयुवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा, पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करावी. घरगुती गॅसच्या किंमती कमी कराव्यात. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना भाताची नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्यांसाठी इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटीने इगतपुरीच्या तहसीलदारांना निवेदन दिले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने आणि प्रदेश काँग्रेस आदिवासी सेलचे नेते लकीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी आदींनी हे निवेदन दिले. निवेदनात नमूद सर्व बाबी आणि मागण्यांचा सरकारने गांर्भियपुर्वक विचार करावा. शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या थांबवुन तातडीने सर्व मागण्या पुर्ण कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे, राष्ट्रवादी नेते आकाश पारख, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष बिलाल सय्यद, निवृत्ती कातोरे, मल्हारी गटखळ, शहराध्यक्ष सत्तार मणियार, माजी पंचायत समिती सदस्य रामदास सोनवणे, हिरामण भोर, छबाजी बोराडे, मधुकर धांडे, दीपक सोनवणे, रितेश दराडे, दौलत राव, सन्नी देहाडे, शैलेश पारख, सुरेश धांडे, संदीप गवारी, विशाल चंद्रमोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!