तळेगावला कृषी सहाय्यकांकडून शेतकरी ओळखपत्रासाठी घरोघरी प्रचार प्रसार

इगतपुरीनामा न्यूज – कृषी विभागाच्या महत्वपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र अतिशय महत्वाचे आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी ३१ मार्चपर्यंत शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे असे आवाहन कृषी सहाय्यक कविता नाईक यांनी केले आहे. इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी सुरु आहे.  तळेगाव येथे शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख पत्र ( फार्मर आयडी ) तातडीने काढण्यासाठी कृषी सहाय्यक कविता नाईक घरोघरी जाऊन अधिक माहिती देत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी ओळख पत्र तथा फार्मर आयडीसाठी तळेगाव येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कृषी सहाय्यक नाईक यांनी शेतकऱ्याना फार्मर आयडीबाबत घरोघरी जाऊन माहिती दिली. यामुळे येथील जास्त शेतकऱ्यानी ओळखपत्र काढून घेतली आहेत. बाळू मेंगाळ, नामदेव लोहरे, ज्ञानेश्वर रायकर आदी शेतकरी कृषी विभागाला सहकार्य करीत आहेत.

error: Content is protected !!