कृषी पंढरीचे वारकरी स्व. कारभारी दादा गिते साक्षात पांडुरंगस्वरूप – पेरे पाटील : शिवार प्रतिष्ठानतर्फे कृषी विज्ञान पुरस्कार सोहळा संपन्न : शेतकऱ्यांना दिशा देणाऱ्या गिते परिवाराचा सर्वांसमोर आदर्श – माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात

इगतपुरीनामा न्यूज – शंभर वर्षांचे आरोग्य मिळण्यासाठी स्वच्छ हवा, पाणी आणि चांगले अन्न मिळाले पाहिजे. यासाठी सक्षम शेती, विषमुक्त शेती काळाची गरज आहे. यासाठी निरंतर झटणारे कृषी पंढरीचे वारकरी स्व. कारभारी दादा गिते हे साक्षात पांडुरंगस्वरूप आहेत. म्हणूनच त्यांचा पुण्यस्मरण कार्यक्रमाचा सोहळा दरवर्षी पार पडतो. आयुष्यभर समाजाची सेवा करणाऱ्या ह्या व्यक्तिमत्वाला शतदा वंदन करतो प्रतिपादन […]

कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानचे कृषी विज्ञान पुरस्कार जाहीर : १६ नोव्हेंबरला सोनोशी येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा

  इगतपुरीनामा न्यूज – कारभारी दादा शिवार प्रतिष्ठान सोनोशी यांच्यातर्फे गेल्या वर्षापासून कृषी विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यावर्षी कृषी विज्ञान शास्त्रज्ञ विभागातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना त्यांच्या ज्वारीच्या विविध जातीच्या संशोधनासाठी शेती आणि शेतकऱ्यांसाठी भरीव योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या शोधनिबंधाचे जगभर संदर्भ वापरले जातात. शेतकरी विभागातून […]

कावनई येथे चक्रीवादळाच्या पावसाने पोल्ट्रीचे पत्रे उडुन २५० कोंबड्यांचा मृत्यू ; सव्वा लाखांच्या नुकसानीचा अंदाज

प्रभाकर आवारी इगतपुरीनामा न्यूज : मुकणे धरणाच्या कावनई भागात शुक्रवारी दुपारी ४ वाजे दरम्यान चक्रीवादळासह झालेल्या पावसाने पोल्ट्रीचे पत्रे उडून त्यातील २५०च्या आसपास कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. मिनीनाथ गुळवे यांच्या पोल्ट्रीफार्ममध्ये अंदाजे १ ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. चक्रीवादळच्या तीव्रतेने धरणातील पाणी पावसाप्रमाणे हवेत उडतांना दिसत होते. आहे. धरणाच्या दिशेने चक्रीवादळ तयार […]

घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – सभापती झाल्यापासुन तीन महिन्यात १८ कामे मार्गी लावली आहे. संस्थेसाठी जागा खरेदी करणे, अतिक्रमण काढणे, नवीन गाळे बांधणे, जागा विकसित करणे, जीर्ण झालेले गाळे पाडुन नवीन गाळे बांधणे, नवीन शौचालय बांधणे आदी कामे सुरु आहेत. येत्या हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला व्यापाऱ्यांकडुन जास्तीत जास्त भाव कसा देता येईल यासाठी शेतकऱ्यांच्या बाजुने खंबीर उभा राहणार […]

इगतपुरी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा : इंदिरा काँग्रेसचे प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात ह्यावर्षी पावसाने लवकरच पाठ फिरवली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकासह, नागली, वरई, भुईमुग आदी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे शासनाने दखल घेऊन इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आदी मागण्यांचे निवेदन इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, रामदास मालुंजकर यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे प्रांताधिकारी रवींद्र […]

इगतपुरी तालुका कृषी विभागातर्फे बारशिंगवे, वासाळी येथे पौष्टिक तृणधान्याबाबत जागृती अभियान

इगतपुरीनामा न्यूज – शालेय विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करून आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवावी असे प्रतिपादन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले. तालुका कृषी अधिकारी कार्यालय इगतपुरी यांच्यामार्फत तालुक्यातील विविध शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याविषयी जागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बारशिंगवे, वासाळी येथील शाळेत झालेल्या कार्यक्रमात ते […]

युरिया खतांबाबत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवा : वंचित बहुजन आघाडीचे इगतपुरीच्या तहसीलदारांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कृषी साहित्याचे विक्रेते युरिया खत नसल्याचे भासवून चढ्या भावाने शेतकऱ्यांची लूटमार करीत आहेत. त्यांना सरकारी दराने युरिया खताची विक्री करण्याचे आदेश देण्यात यावे, दुकानांची अचानक तपासणी करावी. दुकानाच्या बाहेर खते बी बियाणे, औषधे यांचे दरपत्रक, शिल्लकसाठा यांचा फलक लावावा आदी मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विक्रम जगताप, तालुका निरीक्षक […]

नियोजन, सातत्य, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना टोमॅटो ह्या लाल सोन्याद्वारे भरघोस उत्पन्नाची संधी : कारभारी दादा शिवार प्रतिष्ठान आयोजित शिवारफेरी, चर्चासत्र आणि संवादयात्रा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – अचूक नियोजन, सातत्य, नवीन तंत्रज्ञान आणि बाजाराचा अभ्यास करून टोमॅटो लागवड केली तर द्राक्षानंतर टोमॅटो हे मुबलक आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक असल्याचा दृढविश्वास २५ एकरातील टोमॅटो पिकाच्या शिवार फेरीत शेतकऱ्यांना निर्माण झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत टँकरच्या पाण्यावर टॉमॅटोने फुललेला परिसर शेतकऱ्यांना आनंद आणि प्रेरणा देणारा ठरला. कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानतर्फे सोनोशी […]

२५ एकरातील टोमॅटोच्या यशस्वी लागवडीचे अचूक नियोजन अनुभवायला या : सोनोशी येथे उद्या टोमॅटो पिकाची शिवार फेरी, तज्ञांचे मार्गदर्शन आणि मिळणार प्रश्नांची उत्तरे

इगतपुरीनामा न्यूज – कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानच्या वतीने टोमॅटो पिकावर चर्चा सत्र, पीक पाहणी आणि शेतकरी संवाद यात्रा उद्या रविवारी ६ ऑगस्टला होत आहे. सकाळी १० ते १२:३० या वेळेत सोनोशी ता. संगमनेर येथे हा कार्यक्रम होणार आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी, कामगार, शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठातील प्राध्यापक, कृषी अधिकारी, विक्रेते, नर्सरी, औषध कंपनी, व्यापारी आणि ग्राहक […]

खतांच्या कंपनीकडून युरिया सोबतची लिंकिंग बंद करावी : कृषिमंत्री ना. धनंजय मुंढे यांच्याकडे गोरख बोडके यांची पत्राद्वारे मागणी

इगतपुरीनामा न्यूज – रासायनिक खते कंपनीकडून युरिया सोबत होत असलेली लिंकिंग बंद करावी या मागणीचे पत्र राष्ट्रवादीचे नाशिक कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंढे यांच्याकडे केली आहे. एक वर्षापासून सर्व कंपन्या युरिया सोबत इतर दाणेदार खते लिंक करून विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात देतात. युरिया गोणीसोबत रासायनिक खताची गोण किवा इतर साहित्य लिंक […]

error: Content is protected !!