इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी संपत किसन वाजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीचे सर्व स्तरात स्वागत होऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात उपसभापती निवडीसाठी संचालकांची सभा आज पार पडली. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा निवडणूक अधिकारी म्हणून अर्चना सैंदाणे यांनी […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – दैनंदिन आहारात अधिकाधिक रानभाज्यांचा समावेश व्हावा, लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) नाशिक, कृषी विज्ञान केंद्र नाशिक आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्टला उदोजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय, केबीटी इंजिनियरिंग कॉलेज जवळ डीके नगर गंगापूररोड नाशिक येथे रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात […]
इगतपुरीनामा न्यूज – हवामान बदलास अति संवेदनशील गावांचे प्रातिनिधीक असणाऱ्या चिंचलेखैरे येथे आदिवासी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी सुसंवाद कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक परिमल सिंह (भा. प्र. से.), मृद विज्ञान विशेषज्ञ प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मुंबईचे विजय कोळेकर, नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, उपविभागीय […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालक्यातील शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता आपल्या पिकाचा विमा उतरवून घ्यावा. शासनाने मागील वर्षापासून शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा लागू केला आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन जास्तीत जास्त पीक विमा काढावा असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी केले. इंदोरे येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडा निमित्त शेतकरी प्रशिक्षणात […]
इगतपुरीनामा न्यूज – साकुरफाटा येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सर्व कृषी सेवा केंद्रात विविध प्रकारचे भाताचे वाण उपलब्ध आहेत. यासह शासकीय दराने शेतकऱ्याना योग्य प्रतीचे भात बियाणे, रासायनिक खतांचा पुरेसा खत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. साकुर फाट्यावरील सर्व कृषी सेवा केंद्रात विविध प्रकारचे बी बियाणे घेण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. सुंदर एन […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात कृषी विभागामार्फत खरीप हंगामात भात, नागली, वरई या पिकांचे प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना या प्रात्याक्षिकासाठी भाताचे तिलक, नागलीचे फुले कासारी तर वरईचे एकादशी वाण उपलब्ध करून देण्यात आले आहे असजी माहिती इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी दिली. इगतपुरी तालुका हा भात […]
इगतपुरीनामा न्यूज – समृद्धी महामार्गाच्या कामामुळे एक हेक्टर पेरू बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वारंवार प्रयत्न करुनही समृद्धी महामार्गाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. भरपाई न देता फसवणूक करून अन्याय करीत आहेत. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथील पीडित शेतकरी काशिनाथ वाळू शिंदे यांनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – नैसर्गिक शेती या विषयावर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण झाले. कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक व कृषी विज्ञान केंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत हे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन कार्यक्रमावेळी आत्माचे […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – बेलगाव कुऱ्हेचे शेतकरी राजू बोराडे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत दहा गुंठ्यात गुलाब शेतीचा प्रयोग यशस्वी केली आहे. दिल्लीत फुल मार्केटमध्ये त्यांच्या गुलाबाला चांगला भाव मिळत आहे. यामधून त्यांना एका वर्षात साडे तीन लाख उत्पन्न मिळाले. ठिबक सिंचन सुविधा असलेले पॉलीहाऊस उभारून त्यांनी हा प्रयोग केला आहे. या शेतीतून […]
इगतपुरीनामा न्यूज – उत्तम शेतीमुळे समाजापुढे आदर्श उभा करणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी व संलग्न क्षेत्रात उत्कृष्ठ कामासाठी आत्मा अंतर्गत विविध पुरस्कार प्रदान करतांना आनंद होत आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामाची ओळख होवून प्रेरणा निर्माण होईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी केले. जिल्हा प्रशासन, जि. […]