इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, रिपाइं आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रचाराला सुसूत्रता आली आहे. दोन्ही तालुक्यातील गावागावात प्रचाराची यंत्रणा पोहचली असून मतदारांनी श्री. खोसकर यांना निवडून आण्यासाठी कंबर कसून काम करणार असल्याचे सांगितले. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार निर्मला गावित यांना सर्वत्र उत्तम प्रतिसाद लाभत आहे. अपक्ष उमेदवारी घोषित करून त्यांनी आपणही सक्षमपणे लढायला तयार असल्याचे सांगितले आहे. निर्मला गावित यांच्यासोबत दोन्हीही तालुक्यातील पदाधिकारी सक्रियतेने प्रचारयंत्रणेत सहभागी झाले असून यावेळी निवडून येण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. गावोगावी आणि वाड्यावस्त्या पिंजून काढल्या […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर ह्या दोन्ही तालुक्यात या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण ढवळून निघाले. यावेळी बड्या बड्या प्रस्थापित नेत्यांनी अन्य पक्षाचा झेंडा हाती धरला. प्रत्येक राजकीय पक्ष ह्या संक्रमणातून जात आहे. मात्र नेत्यांच्या एकतर्फी कारभारामुळे दबलेले युवक आता पुढे येऊ लागले आहेत. मी म्हणजे पक्ष, मी सांगेल ती पूर्वदिशा असे म्हणणारे जेष्ठ नेते […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील मातोश्री हॉस्पिटल म्हणजे दुर्मिळ अतिदुर्मिळ शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारावर उपचार करणारे सर्वोत्तम रुग्णालय म्हणून जिल्हाभर मान्यता पावले आहे. हॉस्पिटलच्या संचालक डॉ. हेमलता चोरडिया, डॉ. जितेंद्र चोरडिया यांच्यातील सेवाभाव आणि जोखीम घेऊन लोकांना वाचवण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. आपले तज्ज्ञ, कुशल डॉक्टर आणि सहकाऱ्यांसह रुग्णांवर उपचाराची […]
चंद्रकांत जगदाळे : इगतपुरीनामा न्यूज – दिपावली म्हणजे चैतन्याचा जागर… प्रकाशाचा उत्साह वातावरणात पसरण्याचा हा उत्सव…अंधारावर विजय मिळविण्याच्या या काळात एक वृद्ध महिला अंधारात राहत असल्याबाबत समजताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने त्या वृद्धेचे वीजबिलाची रक्कम भरून त्या वृद्ध महिलेचे घर प्रकाशमय केले. लासलगाव महावितरणचे शहर कक्ष सहायक अभियंता अजय साळवे यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक परिसरात […]
इगतपुरीनामा न्यूज – दरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत उपक्रमशील शिक्षिका वंदना सोनार यांना महाराष्ट्र शासनाच्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय शैक्षणिक योगदानासाठी विनोबा स्टार टिचर जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. नुकताच अतिदुर्गम आदिवासीबहुल भागातील दरेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वंदना […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील लकीभाऊ जाधव हा उमेदवार सामान्य जनतेचे प्रतीक असणारा गरीब कुटुंबातील उमेदवार आहे. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक कानाकोपऱ्यात लकीभाऊ जाधव हा लढवय्या तरुण लोकप्रिय आहे. ह्याच लकीभाऊच्या माध्यमातून ह्या मतदारसंघातील भांडवलदारांचा अहंकार मोडून टाकायचा आहे. यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, इंदिरा काँग्रेस आणि […]
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४ जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच ‘आचारसंहिता’ म्हटले जाते. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. आचारसंहिता […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात महायुतीत असलेला बेबनाव उघड झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणाला शिवसेनेने एबी पाठवत आपला इरादा स्पष्ट केला आहे. मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीच्या शिवसेनेने स्थानिक भूमिपुत्र असलेले रवींद्र भोये यांना पक्षाचा एबी फॉर्म पाठवला. मात्र त्यास अवघ्या पाच दहा मिनिटांचा उशीर झाल्याने तांत्रिक कारणास्तव […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी इगतपुरी अनुसूचित जमाती राखीव मतदारसंघातून आज अखेरच्या दिवसापर्यंत २६ जणांनी ३९ उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि अपक्ष म्हणून विद्यमान आमदार हिरामण भिका खोसकर, इंदिरा काँग्रेसतर्फे लकीभाऊ भिका जाधव, इंदिरा काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि २ अपक्ष म्हणून माजी आमदार निर्मला रमेश गावित, […]