“मीच आमदार.. मीच लकीभाऊ” : इगतपुरी मतदारसंघातील युवाशक्ती काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव यांच्या विजयासाठी एकटवली : युवाशक्तीने निवडणूक हाती घेतल्यामुळे लकीभाऊ जाधव इतिहास रचणार

इगतपुरीनामा न्यूज – इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील तरुणांची फौज रणधुमाळीत उतरली आहे. आपल्या पातळीवरून समक्ष, रॅली, सोशल मीडिया, गाठीभेटी, फोनद्वारे संवाद साधून मतदारांना लकीभाऊ जाधव यांना निवडून देण्याचे आवाहन केले जाते आहे. युवकांच्या प्रचारामुळे खऱ्या अर्थाने ‘जय जवान”चा नारा सार्थक झाल्याची भावना मतदारांनी व्यक्त केली. सोशल मीडियामुळे तरुण पिढी […]

सर्वाधिक १७ उमेदवार असल्याने एका मतदान केंद्रावर लागणार २ मतदान यंत्र : असे आहेत उमेदवार, त्यांचा क्रम आणि चिन्ह

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात आहेत. २ तालुक्यात ३०० मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर २ मतदान यंत्र लावले जाणार आहे. मतदान यंत्रावर म्हणजे एका बॅलेट युनिटवर एकूण १६ उमेदवारांची नावे समाविष्ट होतील, अशी रचना असते. त्यानुसार मतपत्रिका तयार केली जाते. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनंतर मतपत्रिकेवर वरीलपैकी कोणीही नाही (नोटा) हे […]

शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक हिरामण खोसकर यांच्यासाठी लागले कामाला : जास्तीतजास्त मतांनी श्री. खोसकर आमदार होतील – माजी खासदार हेमंत गोडसे

इगतपुरीनामा न्यूज – महायुती सरकारच्या लोकाभिमुख आणि विकासाच्या योजना, आमदार हिरामण खोसकर यांनी केलेली विकासकामे, तगडा जनसंपर्क आणि शिवसैनिकांची अफाट ताकद महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना दुसऱ्यांदा विधासभेत पाठवणार आहेत. तरीही शिवसैनिकांनी गाफिल नं रहाता जास्तीतजास्त मतांनी निर्णायक मतदान महायुतीला मिळण्यासाठी सक्रियतेने काम करावे, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आणि महायुतीचे स्वप्न करण्यासाठी जीवाचे रान […]

इगतपुरी विधानसभा निवडणुकीत कोण ठरेल ‘लकी’ ? : ‘अशी’ असेल राजकीय समीकरणे

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघ लक्षणीय लढतीसाठी प्रसिद्ध आहे. माघारीनंतर १७ उमेदवारांचे भवितव्य मतदाराच्या हाती आले आहे. सर्वाधिक इच्छुक असणाऱ्या महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने लकीभाऊ जाधव यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे नाराज होऊन शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या माजी आमदार निर्मला गावित पदर खोचून अपक्ष उभ्या ठाकल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाची […]

प्रमुख लढत काँग्रेसचे लकीभाऊ जाधव, राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर, मनसेचे काशिनाथ मेंगाळ आणि अपक्ष निर्मला गावित यांच्यातच…!: दिसायला सप्तरंगी पण होणार चौरंगी लढत

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी अनुसूचित जमाती राखीव विधानसभा मतदारसंघात आता चांगलीच मजा येणार आहे. महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेसचे लकीभाऊ जाधव, महायुतीतील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर, मनसेतर्फे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, अपक्ष उमेदवार माजी आमदार निर्मला गावित, अपक्ष बाळासाहेब शिवराम झोले, वंचित बहुजन आघाडीचे भाऊराव डगळे, स्वराज्यचे डॉ. शरद तळपाडे यांच्यात आता […]

जनतेच्या आशीर्वादाने आगामी विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवून देणार : अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिवराम झोले

इगतपुरीनामा न्यूज – मला राजकारणाचे बाळकडू माझे वडील माजी आमदार शिवराम झोले यांच्याकडून मिळाले. त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेऊन स्थानिक भूमिपुत्र म्हणुन मला जनतेची सेवा करायची असून त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत मला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत असून जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहे. यंदाच्या निवडणुकीत आमची मोठी […]

रिपाइं आणि महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांचा विजय निश्चित – केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले

इगतपुरीनामा न्यूज – महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना दिलेली उमेदवारी महायुतीला विजय संपादन करून देणारी आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तळागाळातील कार्यकर्ते हिरामण खोसकर यांच्यासाठी प्रचंड कष्ट घेत आहेत. यामुळे आजच महायुतीचे उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांचा विजय घोषित झाल्यात जमा आहे. तरीही जास्तीतजास्त […]

धनाच्या जोरावर सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा – प्रदेश काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात : काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ संवाद बैठक संपन्न : इगतपुरी मतदारसंघातील युवकांच्या मोठ्या उपस्थितीने आली रंगत

इगतपुरीनामा न्यूज – महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभचे उमेदवार लकीभाऊ जाधव अत्यंत लढाऊ आणि सक्षम योद्धा असून सर्वांना सोबत घेऊन ह्या मतदारसंघात मताधिक्याने निवडून येणार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभा होणार आहेत. इगतपुरी मतदारसंघातील मतदारांनी सुद्धा हा गरीबाच्या […]

थेट राष्ट्रपतीपर्यंत जाऊन लोकांच्या समस्या मांडणारे इगतपुरी विधानसभेचे काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव : लकीभाऊ जाधव निवडून आल्यावर मतदारसंघाचा कायापालट करणार 

इगतपुरीनामा न्यूज – आमचा उमेदवार सर्वसामान्य आणि आदिवासी माणसाच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी थेट देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापर्यंतही अनेकदा जाऊन लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडायचे काम आमच्या लकीभाऊ जाधव ह्या उमेदवाराने केलेले आहे. म्हणूनच इंदिरा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि वरिष्ठ नेत्यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील […]

गरीब कुटुंबातील लकीभाऊ जाधव विरुद्धच्या संपूर्ण धनाढ्य शक्तीचा पराभव करून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून द्या – राष्ट्रवादी प्रदेश सचिव उमेश खातळे

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार युवा नेतृत्व लकीभाऊ जाधव यांच्या विजयासाठी सूक्ष्म नियोजन प्रगतीपथावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्भव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करण्यासाठी लकीभाऊ जाधव यांना निवडून द्यावे. […]

error: Content is protected !!