भरविर सोसायटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित विकास पॅनलची सत्ता : चेअरमनपदी मोहन झनकर, व्हॉइस चेअरमनपदी नंदू टोचे यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. १ इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील अत्यंत नावाजलेल्या आणि संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या भरविर बुद्रुक व भरविर खुर्द येथील विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमन, व्हॉइस चेअरमन पदाची निवड सरपंच अरुण घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. ह्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला. चेअरमनपदी मोहन झनकर, तर व्हॉइस चेअरमनपदी नंदु टोचे यांची […]

वाडीवऱ्हे गटातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी डॉ. संजय जाधव करणार उमेदवारी : एसएमबीटी रुग्णालयात प्राध्यापक असणारे डॉ. जाधव उच्चशिक्षित उमेदवार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटात अनुसूचित जातीचे आरक्षण निश्चित झाल्याने लोकांच्या सेवेसाठी ह्या गटातून उमेदवारी करणार आहे. या माध्यमातून गटासह इगतपुरी तालुक्यातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध राहील. माझ्या अनेक वर्षाच्या अनुभवाचा फायदा जनसेवेसाठी करण्यासाठी मी वाडीवऱ्हे गटातून उमेदवारी करणार असल्याची माहिती डॉ. संजय दामू जाधव यांनी दिली. सालगाडी कुटुंबातून अनेक समस्यांचा सामना […]

नवे नेतृत्व निर्मित करणारे आणि अनेकांच्या मनसूब्यांवर पाणी फिरवणारे आरक्षण : इगतपुरी तालुक्यातील गट आणि गणांच्या निवडणुकीचा मागोवा

लेखन – भास्कर सोनवणे, मुख्य संपादक महत्वाची सूचना : ह्या लेखाची कॉपी करण्याला परवानगी नाही. वाडीवऱ्हे ह्या जिल्हा परिषद गटातून इगतपुरी तालुक्याला नवे नेतृत्व निर्मित करुन देणारे आरक्षण पडले असल्याची ऐतिहासिक बाब आहे. वर्षानुवर्षे प्रस्थापित राजकीय नेत्यांना सहाय्य करणाऱ्या तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांचे नवे नेतृत्व ह्या गटामधून इगतपुरी तालुक्याला लाभणार आहे. घोटी ह्या महत्वपूर्ण गटातुन अभूतपूर्व […]

इगतपुरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर : प्रस्थापितांना दे धक्का देणारे आरक्षण

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ इगतपुरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटांपैकी 2 गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. 1 गट सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाला. बहुचर्चित घोटी गटामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिलेसाठी आरक्षण पडल्याने ह्या गटात तुल्यबळ लढती होणार आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे, नांदगाव सदो, खंबाळे, धामणगाव, घोटी ह्या ५ जिल्हा […]

इगतपुरी पंचायत समितीच्या १० गणांचे आरक्षण जाहीर : इच्छुकांच्या तयारीला येणार वेग

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ इगतपुरी पंचायत समितीच्या १० गणांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यातील ५ गण विविध प्रवर्गाच्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. एकूण १० पंचायत समिती गणांपैकी अनुसूचित जमातीसाठी 2, अनुसूचित जमाती महिला 2, अनुसूचित जातीसाठी १, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 3 गण, सर्वसाधारण महिला साठी 2 गण आरक्षित करण्यात आले. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे […]

इगतपुरी पालिकेच्या शिवसेना नगरसेवकाचा एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश : आणखी ६ नगरसेवक प्रवेश करण्याची शक्यता

इगतपुरीनामाची बातमी पुन्हा एकदा खरी ठरली इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ “इगतपुरीनामा”ने इगतपुरी नगरपालिकेचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता बातमीद्वारे व्यक्त केली होती. ती आज खरी ठरली. इगतपुरी येथील शिवसेना नगरसेवकाने शिंदे गटात प्रवेश केला आहे. लवकरच आणखी 6 नगरसेवक शिंदे गटाचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. माजी […]

शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या इगतपुरी पालिकेकडे एकनाथ शिंदे गटाचे लक्ष ? : काही नगरसेवकांबाबत नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ शिवसेना रिपाई युतीचे इगतपुरी नगरपालिकेत १३ नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष अशी सत्ता असून भाजपाचे ४ नगरसेवक तर शिवसेना संबंधित १ अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. ह्या नगरपालिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटाचे विशेष लक्ष लागले असल्याची खमंग चर्चा सुरु झाली आहे. माजी मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, नुकतेच शिंदे गटात […]

मतदार यादी तपशील प्रमाणिकरणासाठी आधार क्रमांकाची माहिती द्या : आधारची माहिती ऐच्छिक ; मतदारांनी पुढाकार घेऊन मोहीम यशस्वी करण्याचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या असून या सुधारणांची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२२ ते १ एप्रिल २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदार यादीतील तपशील प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधार क्रमांकाची माहिती संकलित करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२२ रोजी पहिल्या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती […]

इगतपुरीनामाची बातमी खरी ठरली – अखेर माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांचा शिवसेनेला “जय महाराष्ट्र” : शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात दाखल

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी आपल्या अनेक समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा झेंडा हाती घेतला आहे. 24 जुलैला इगतपुरी तालुक्यातील एक माजी आमदार कार्यकर्त्यांसह शिंदे गटाच्या वाटेवर ? ही बातमी सर्वप्रथम “इगतपुरीनामा”ने प्रकाशित करून पक्षांतर होणार असल्याचे संकेत दिले होते. इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी इगतपुरी तालुक्यातून आज […]

इगतपुरी तालुक्यातील एक माजी आमदार एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर ? : नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित भेटीमुळे चर्चा रंगली

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात शिवसेना दुभंगवणारे वादळ उभे केले. त्याप्रसंगात आणि शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाली त्यानंतरच्याही प्रसंगात स्थिर आणि जैसे थे राहिलेले इगतपुरी तालुक्यातील कट्टर शिवसैनिक दिसून आले. मात्र इगतपुरी तालुक्यातील एक माजी आमदाराच्या रूपाने आता तालुक्यातील शिवसेना फुटीच्या वाटेवर आली असल्याची चर्चा इगतपुरी तालुक्यात रंगली आहे. त्यांच्यामुळे एक […]

error: Content is protected !!