इगतपुरीसाठी युवानेते बाळासाहेब झोले यांना उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडून कामाला लागण्याचे संकेत 

इगतपुरीनामा न्यूज – उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची सिन्नर दौऱ्यात माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र युवा नेते बाळासाहेब उर्फ जयप्रकाश झोले यांनी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष  डाॅ.श्रीराम लहामटे यांनी अजित दादांना बाळासाहेब झोले यांना उमेदवारी देण्यात यावी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सदर जागा सोडण्यात यावी अशी मागणी केली. […]

जनसेवेसाठी २४ तास सक्रिय असणारे सर्वसमावेशक माजी आमदार काशिनाथ मेंगाळ : सर्वात तरुण आमदार म्हणून गिनीज बुकात नोंद : शिवसेना शिंदे गट तथा महायुतीतर्फे २०२४ ला होणार आमदार

भास्कर सोनवणे – इगतपुरीनामा न्यूज – २००४ पूर्वीच्या काळात इगतपुरी तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील विकासाचे भयाण वास्तव, पाण्यासाठी गावोगावी होणारा मायबहिणींचा आटापिटा, शिक्षणाच्या सोयीसुविधांचा अभाव, रस्ते आणि दळणवळणाच्या दरिद्री व्यवस्था, युवकांना स्वयंरोजगार आणि हक्काच्या रोजगारासाठी करावी लागणारी कसरत आणि भूमिपुत्र शेतकऱ्यांचा पिकांना पाणी द्या म्हणणारा आर्त टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. हे जळजळीत भयानक वास्तव […]

शिवसेनेचे प्रबळ इच्छुक उमेदवार रवींद्र भोये यांना इगतपुरी परिसरात अभूतपूर्व प्रतिसाद : इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा कायापालट करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा दिला शब्द

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. ही बेरोजगारी कमी व्हावी म्हणून दोन्हीही तालुक्यात अजून औद्योगिक वसाहतीसाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करणार आहे. इगतपुरी त्र्यंबकला मोठ्या कंपन्या आणल्यानंतर येथील स्थानिक बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. मोठ्या प्रमाणात धरणे असून देखील मार्च महिन्यानंतर महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. यावर […]

प्रत्येक राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची संख्या चिंताजनक : ग्रामपंचायतीतील ‘पडेल’ व्यक्ती सांभाळताहेत प्रचाराची धुरा

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघात आमदार होण्यासाठी बरेच लोक गुढघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची संख्या रोजच वाढते आहे. युती आणि आघाडीधर्म पालन न करता प्रत्येकजण आपणच ह्या मतदारसंघांचे तारणहार आहोत असा आविर्भाव दाखवत आहे. पण ज्या मतदार राजाच्या भरवश्यावर हे सगळं चाललंय त्या मतदारांसाठी नेमकं काय करणार आहोत? याचा […]

ॲड. संदीप गुळवे – ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे समर्थ नेतृत्व : महाविकास आघाडी आणि टिडीएफतर्फे भरणार उमेदवारी अर्ज

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – राज्याच्या विविध भागात ज्यांच्या पुण्याईने आणि आशीर्वादाने हजारो कुटुंबांत चूल पेटते असे दैदीप्यमान व्यक्तिमत्व म्हणजे इगतपुरी तालुक्याचे भूमिपुत्र स्व. लोकनेते गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे. आईवडील आणि देवांच्या सोबत स्व. दादासाहेबांची प्रतिमा अनेक घरात पूजली जाते, कारण त्या त्या लोकांसाठी ते देवस्वरूप होते. राजकारण आणि पक्ष न पाहता अनेकांची […]

मविप्र निवडणुकीसाठी ॲड. दिनकर खातळे यांच्या उमेदवारीची इगतपुरी तालुक्यात चर्चा : उच्चशिक्षित, तरुण, अनुभवी आणि सक्षम व्यक्तिमत्वामुळे ॲड. दिनकर खातळे लोकप्रिय

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ मराठा विद्या प्रसारक समाज ह्या अग्रगण्य शिक्षण संस्थेची निवडणूक सुरु आहे. ह्या निवडणुकीत इगतपुरी तालुक्यातील उच्चशिक्षित, कायदेतज्ज्ञ आणि सभासदांमध्ये दांडगा लोकसंपर्क असणारे ॲड. दिनकर संतुजी खातळे हे उमेदवारी करीत आहेत. निवडणुकीच्या रिंगणातील दोन्ही पॅनलचे त्यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष लागले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी, ग्रामीण भागातील समस्यांची जाण, दोन दशके इगतपुरी […]

वाडीवऱ्हे गटातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी डॉ. संजय जाधव करणार उमेदवारी : एसएमबीटी रुग्णालयात प्राध्यापक असणारे डॉ. जाधव उच्चशिक्षित उमेदवार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटात अनुसूचित जातीचे आरक्षण निश्चित झाल्याने लोकांच्या सेवेसाठी ह्या गटातून उमेदवारी करणार आहे. या माध्यमातून गटासह इगतपुरी तालुक्यातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध राहील. माझ्या अनेक वर्षाच्या अनुभवाचा फायदा जनसेवेसाठी करण्यासाठी मी वाडीवऱ्हे गटातून उमेदवारी करणार असल्याची माहिती डॉ. संजय दामू जाधव यांनी दिली. सालगाडी कुटुंबातून अनेक समस्यांचा सामना […]

error: Content is protected !!