भरविर सोसायटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित विकास पॅनलची सत्ता : चेअरमनपदी मोहन झनकर, व्हॉइस चेअरमनपदी नंदू टोचे यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील अत्यंत नावाजलेल्या आणि संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या भरविर बुद्रुक व भरविर खुर्द येथील विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमन, व्हॉइस चेअरमन पदाची निवड सरपंच अरुण घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. ह्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला. चेअरमनपदी मोहन झनकर, तर व्हॉइस चेअरमनपदी नंदु टोचे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीचे इगतपुरी तालुक्यात स्वागत होत आहे. सोसायटीच्या कार्यक्षेत्रात भरविर बुद्रुक व भरविर खुर्द आणि भंडारदरावाडीचा समावेश आहे. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे निर्विवाद वर्चस्व असणारी ही सोसायटी असून आमदार कोकाटे यांनी संचालक आणि नवे पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्रामस्थांचे सहकार्य आणि त्यांनी ठेवलेल्या विश्वासामुळे आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित विकास पॅनलने विजय मिळवला. लोकांचा विश्वास सार्थकी ठरवून एकदिलाने गावकरी आणि शेतकरी यांच्यासाठी निष्ठेने काम करणार आहेत.
- अरुण घोरपडे, सरपंच भरविर बुद्रुक

निवडीवेळी संचालक अरुण नामदेव घोरपडे, सुरेश पांडुरंग जुंदरे, संतू भिवा झनकर, सुरेश महादु झनकर, विष्णु अमृता झनकर, रतन बाबुराव झनकर, दत्तू दशरथ झनकर, विमल एकनाथ झनकर, सिंधु भाऊसाहेब म्हस्के, गेणू यशवंत टोचे, पार्वताबाई हरिश्चंद्र टोचे उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. बिनविरोध निवडणुकीसाठी सरपंच अरुण घोरपडे, खंडेराव शिवराम झनकर, मधुकर कोकणे, नवनाथ भाऊ झनकर, साहेबराव झनकर, भगवान जुंदरे, संजय झनकर, साहेबराव झनकर, राधाकिसन झनकर, बहिरू झनकर, संजय जुंदरे, भरत झनकर, शिवाजी झनकर, दत्तू जुंदरे, रमेश टोचे, संपत टोचे, तुळशीराम टोचे, दत्तू पुंडे, राजू शिंदे आणि गावकऱ्यांनी महत्वाची भुमिका पार पाडली. पॅनलचे नेतृत्व आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!