भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
इगतपुरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटांपैकी 2 गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. 1 गट सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाला. बहुचर्चित घोटी गटामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिलेसाठी आरक्षण पडल्याने ह्या गटात तुल्यबळ लढती होणार आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे, नांदगाव सदो, खंबाळे, धामणगाव, घोटी ह्या ५ जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. तालुक्यातील प्रस्थापित राजकारण्यांना याची उत्सुकता लागून राहिली होती. झालेल्या सोडतीत कावजी ठाकरे यांचा नांदगाव सदो, हरिदास लोहकरे यांचा धामणगाव गट ( जुना खेड गट ) सर्वसाधारण झाला. सुशीला मेंगाळ यांचा खंबाळे गट ( जुना शिरसाठे गट ) सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला. नयना गावित यांचा वाडीवऱ्हे गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला. उदय जाधव यांचा घोटी गट अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणामुळे विद्यमान सदस्यांना मोठा फटका बसल्याने आगामी निवडणुकांत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
जिल्हा परिषद गट आरक्षण
खंबाळे ( जुना शिरसाठे गट )- सर्वसाधारण महिला
धामणगाव ( जुना खेड गट ) - सर्वसाधारण
नांदगाव सदो - सर्वसाधारण
घोटी - आदिवासी महिला
वाडीवऱ्हे - अनुसूचित जाती