इगतपुरीनामा न्युज दि. ५
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाचा सौ. सविता मनोहर काजळे यांनी महिना भरापूर्वी राजीनामा दिला होता. आवर्तन पध्दतीने नवीन उपसरपंच पदाची प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रीयेत उपसरपंच पदासाठी ललिता रवी काजळे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी किरण शेलवणे यांनी सौ. ललिता काजळे यांची उपसरपंचपदी निवड जाहीर केली. यावेळी सरपंच उषा चंद्रसेन रोकडे यांनी पेढे भरवून विजयोत्सव साजरा केला. तर मावळत्या उपसरपंच सौ. सविता मनोहर काजळे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य नितीन काजळे, पोपट दिवटे, लतीश रोकडे, कविता प्रभाकर मुसळे, वैशाली दिलीप मुसळे, मनविसे विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, सुखदेव दिवटे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ मुसळे, सूर्यभान काजळे, रामदास दवते कुंडलिक मुसळे, मारुती डोळस, माधव कर्पे, अशोक काजळे, ज्ञानेश्वर कर्पे, राजू रोकडे, सुधाकर काजळे, तानाजी काजळे, शांताराम मुसळे, श्रीहरी गायकवाड, कृष्णा दिवटे, भास्कर काजळे, दवते बाबा उपस्थित होते. यावेळी समर्थकांनी गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला.