इगतपुरी पंचायत समितीच्या १० गणांचे आरक्षण जाहीर : इच्छुकांच्या तयारीला येणार वेग

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

इगतपुरी पंचायत समितीच्या १० गणांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यातील ५ गण विविध प्रवर्गाच्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. एकूण १० पंचायत समिती गणांपैकी अनुसूचित जमातीसाठी 2, अनुसूचित जमाती महिला 2, अनुसूचित जातीसाठी १, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 3 गण, सर्वसाधारण महिला साठी 2 गण आरक्षित करण्यात आले. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, यांच्या उपस्थितीत आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रक्रियेसाठी संदीप दराडे, राजकुमार भालेराव, गणेश गणेशकर, किरण माळवे यांनी साहाय्य केले. जिया विकास सिंग, प्रज्योत जनार्दन करवंदे ह्या विद्यार्थ्यांनी चिठ्ठी काढली. गट आणि गणांचे आरक्षण निश्चित झाल्याने आता इच्छुकांच्या राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत. यासह पक्षांतराच्या घटना वाढणार आहेत. आरक्षणामुळे संधी गमावलेल्या मातब्बर उमेदवारांकडून नव्या गट गणाचा शोध घेतला जाऊन लढा देण्यासाठी पूर्वतयारी सुद्धा सुरु होणार आहे. महिलांचे आरक्षण निघाल्याने सौभाग्यवतीला रिंगणात उतरवण्यासाठी तयार करणे अथवा नव्या प्रभावी महिलांचा शोध घेण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. १० गणांचे निश्चित झालेले आरक्षण खालीलप्रमाणे आहे.

अनुसूचित जाती महिला - साकुर गण ( जुना नांदगाव बुद्रुक गण )
अनुसूचित जमाती - घोटी बुद्रुक, मुंढेगाव
अनुसूचित जमाती महिला - नांदगाव सदो, वाडीवऱ्हे
सर्वसाधारण - धामणगाव, बेलगाव तऱ्हाळे, कावनई
सर्वसाधारण महिला - खंबाळे, काळुस्ते

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!