घोटी बाजार समितीच्या १८ जागांसाठी वैध ठरलेल्या उमेदवारांची पहा नावांसह यादी : २० एप्रिलपर्यंत माघारीनंतर होईल एकूण पॅनलचे चित्र स्पष्ट

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ –  ( सूचना – ह्या संपूर्ण बातमीची कॉपी केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. ) नाशिक जिल्ह्यात मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकिची छाननी पार पडली. वैध उमेदवरांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांनी प्रसिद्ध केली आहे. सहकारी संस्थेचा मतदार संघ गटातुन ७ […]

खंबाळे सोसायटीच्या चेअरमनपदी जयप्रकाश झोले ; व्हॉइस चेअरमनपदी कचरू शिंगोटे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – इगतपुरी तालुक्यातील खंबाळे आदिवासी विविध कार्यकारी संस्थेची चेअरमन, व्हा चेअरमन पदाची निवडणूक इगतपुरीचे माजी आमदार तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवराम झोले यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी जयप्रकाश उर्फ बाळासाहेब शिवराम झोले व व्हॉइस चेअरमनपदी  कचरू नामदेव शिंगोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी खंडुसिंग शामसिंग परदेशी, व्हॉइस […]

१८ पगड जाती आणि बारा बलुतेदारांचा “स्वराज्य” पक्ष राज्याच्या राजकारणातील सक्षम पर्याय – प्रदेश संपर्कप्रमुख करण गायकर : घोटी येथे स्वराज्य पक्ष पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – “स्वराज्य” पक्ष बारा बलुतेदारांचा अठरा पगड जातींचा आहे. स्वराज्याचा ध्वज इगतपुरी तालुक्यातील गावागावात पोहचवून बळकटी निर्माण करा. शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार या पंचसूत्रीवर “स्वराज्य” काम करीत आहे. इगतपुरी तालुक्याला स्वराज्याचा भक्कम बालेकिल्ला बनवण्यासाठी आपण सर्वांनी जीवाचे रान केले पाहिजे. आगामी काळात लोकसभा, विधानसभा यांचे तोरण याच मतदारसंघातून बांधले […]

घोटी बाजार समिती निवडणुकीत पुढाऱ्यांची लागणार कसोटी : १८ जागांसाठी १५९ अर्ज दाखल

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व पक्षीय नेते सरसावले आहे. यात युवकांची मोठ्या प्रमाणात शेतकरी संस्थेत इन्ट्री होताना दिसत आहे. तर आजी-माजी आमदार समोरासमोर येत असल्यामुळे ह्या निवडणुकीकडे सर्वाधिक लक्ष लागून आहे. आज अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाजार समिती आवाराला यात्रेचे स्वरूप आले होते. आतापर्यंत २६६ अर्ज […]

माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोगरे सोसायटीच्या १० जागांवर विजय घोषित

इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – इगतपुरी तालुक्यातील मोगरे विविध कार्यकारी संस्थेच्या निवडणूकीत इगतपुरीचे माजी आमदार तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवराम झोले,  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, श्रावण जाखेरे, पांडुमामा जाखेरे यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद यश मिळवले आहे. ह्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने १० जागांवर विजय मिळवला. निवडून आलेल्या संचालकांत देविदास जाधव, यशवंत उगले, रुपाबाई […]

काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांचा घोटी बाजार समिती निवडणुकीसाठी सोसायटी गटातून अर्ज दाखल

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ – नाशिक जिल्ह्यातील मोठी आर्थिक उलाढाल आणि राजकीय क्षेत्रात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहेत. ह्या निवडणुकीसाठी इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. रमेश जाधव यांनी सोसायटी गटातील आरक्षित जागेवर हा अर्ज दाखल केला. याप्रसंगी जेष्ठ […]

धामणीच्या उपसरपंचपदी स्वराज्य संघटनेच्या रंजना लाड यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – इगतपुरी तालुक्यात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धामणी ग्रामपंचायतीवर उपसरपंचपदी स्वराज्य संघटनेच्या रंजना लाड यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पद्धतीने सरला नारायण भोसले ह्यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण भोसले, गौतम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच बन्सी […]

इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण सोसायटीचे संपूर्ण १२ संचालक अपात्र : इगतपुरीच्या सहाय्यक निबंधकांनी दिला आदेश : नाशिक जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे धाबे दणाणले

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ – इगतपुरी तालुक्यातील पिंपळगांव मोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, पिंपळगांव मोर या सोसायटीचे चेअरमन, व्हॉइस चेअरमनसह संपूर्ण १२ संचालकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर केला नसल्याने संपूर्ण सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. यामुळे जिल्हाभरात […]

घोटी बाजार समिती निवडणूक स्वबळावर ताकदीने लढण्याचा इगतपुरी तालुका भाजपाचा निर्णय

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ – इगतपुरी तालुका भारतीय जनता पार्टीकडून घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी नियोजन करण्यात आले आहे. आज पहिल्याच दिवशी निवडणुकीचे फॉर्म घेऊन बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढण्यात येणार असल्याचा संदेश देण्यात आला. निवडणूक लढण्याच्या तयारीसाठी आणि त्यासंदर्भात नियोजनासाठी घोटी येथे तालुका पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, जिल्हा […]

त्र्यंबक तालुक्यातील विविध दिग्गज पदाधिकाऱ्यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश : त्र्यंबक तालुक्यातील राजकारणाला मिळणार कलाटणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विविध महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकारण यामुळे ढवळून निघाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ह्या पक्षांतरामुळे गणिते बदलली जाणार आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असल्याचे रवींद्र भोये, मिथुन राऊत यांनी […]

error: Content is protected !!