त्र्यंबक तालुक्यातील विविध दिग्गज पदाधिकाऱ्यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश : त्र्यंबक तालुक्यातील राजकारणाला मिळणार कलाटणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विविध महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकारण यामुळे ढवळून निघाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ह्या पक्षांतरामुळे गणिते बदलली जाणार आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असल्याचे रवींद्र भोये, मिथुन राऊत यांनी […]

संस्था आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध – ॲड. संदीप गुळवे : नूतन चेअरमन झोले, व्हॉ. चेअरमन धांडे, व सचिव संघटना जिल्हाध्यक्ष नाठे यांचा सत्कार संपन्न

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ – राजकीय मतभेद बाजुला सारुन संस्था वाढीस लागावी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुक्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध केली. यामध्ये योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे ऋण व्यक्त करतो असे प्रतिपादन मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांनी घोटी येथे केले. मुकणे ग्रामपंचायतीतर्फे खरेदी विक्री संघाचे नूतन चेअरमन माजी […]

घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २७ मार्चला होणार जाहीर : इगतपुरी तालुक्याचे राजकारण चांगलेच तापणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ – उच्च न्यायालयाकडून बाजार समिती निवडणुकांची निकाल लागेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ३० एप्रिल २०२३ पर्यंत करण्याचे निर्देश निवडणूक प्राधिकरणाला देण्यात आले होते. या आदेशामुळे इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम आता वाजले आहे. २७ मार्चला घोटी कृषी उत्पन्न […]

राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा : घोटी बाजार समितीसाठी ३० एप्रिल पूर्वी होणार निवडणुकीची सर्व प्रक्रिया

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – महाराष्ट्रातील ज्या बाजार समित्यांची मुदत संपून निवडणुका घेणे आवश्यक आहे त्या बाजार समित्यांची निवडणूक घेण्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून आज महाराष्ट्र बाजार समिती निवडणूक प्राधिकरणाला आदेश निर्गमित करण्यात आला. ह्या निवडणुकांची निकाल लागेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ३० एप्रिल २०२३ पर्यंत करण्याचे निर्देश निवडणूक प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. अनेक याचिकांची एकत्रित सुनावणी […]

मुंढेगाव सरपंचपदी मंगला चंद्रकांत गतीर तर वासाळी सरपंचपदी सुनीता कोरडे ; दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल घोषित

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – इगतपुरी तालुक्यातील २ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज घोषित करण्यात आला. काही वर्षांपूर्वी सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांना थेट हेलिकॉप्टरने गावी आणणाऱ्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस दिसून आली. हेलिकॉप्टरमुळे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगला चंद्रकांत गतीर ह्या निवडून आल्या. गाजलेले दिवंगत हायटेक सरपंच चंद्रकांत गतीर यांच्या त्या पत्नी […]

राज्यात थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव, वासाळी ग्रामपंचायतीची निवडणूक घोषित

इगतपुरीनामा न्यूज, दि. 9 राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. ह्यामध्ये इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव आणि वासाळी ह्या २ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. निवडणुकीमुळे संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. […]

हिवताप निर्मूलन कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय राव, व्हॉइस चेअरमनपदी उषा देवरे बिनविरोध : २५ वर्षाच्या सत्तेमध्ये परिवर्तन घडवून आपला पॅनल सत्तेवर

इगतपुरीनामा न्यूज, दि. 3 नाशिक जिल्हा हिवताप निर्मूलन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय रामू राव आणि व्हॉइस चेअरमनपदी उषा भारत देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी वृषाली मैद यांनी बिनविरोध निवडीची घोषणा करताच सभासद आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. हिवताप निर्मूलन कर्मचाऱ्यांची अतिशय जिव्हाळ्याची समजली जाणारी ही पतसंस्था प्रमुख अर्थवाहिनी आहे. नुकत्याच झालेल्या […]

एनडीपीटी शिक्षक बँक निवडणुकीत आपलं पॅनलकडून सभासदांना आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 2 नाशिक डिस्ट्रीक्ट प्रायमरी टिचर्स को-ऑप क्रेडीट सोसायटी येवला लि. नाशिक शिक्षक बँकेची निवडणूक 5 नोव्हेंबरला होत आहे. यापुर्वी प्रस्थापित शिक्षक संघटना एकमेकांवर चिखलफेक, आरोप प्रत्यारोप करून निवडणुक लढवत होते. परंतु या पंचवार्षिक निवडणुकीत मात्र 6 + 5 + 4 हा फॉर्म्युला वापरून एकत्र येत एकता विकास नावाने निवडणुकीला सामोरे जात आहे. […]

आवळी दुमाला उपसरपंचपदी शैला रामदास जमधडे यांची निवड

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. 2 आवळी दुमाला ग्रामपंचायतची निवडणुक मोठ्या चुरशीची होऊन त्यात निवडून आलेल्या शैला रामदास जमधडे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. उपसरपंच निवडीच्या कार्यक्रमात सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन ही निवड झाली. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच लताबाई भले, नवनियुक्त सदस्य कमल कोंडाजी जमधडे, काळू भिवा मुकणे, रामचंद्र तुकाराम मुकणे, शकुंतला पंढरी वाघ, धनंजय […]

भावली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेला मिळाले निर्विवाद यश : मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निवडणूक

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ इगतपुरी तालुक्यातील महत्वपुर्ण गाव असणाऱ्या भावली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. रतनकमार इचम यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनलने बाजी मारली. या निवडणुकीत थेट सरपंचपदी लक्ष्मण घोडे निवडून आले. यामुळे तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदी आपले खाते उघडल्याचे दिसुन आले. ग्रामपंचायतीच्या सर्वच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रचंड चुरस दिसून […]

error: Content is protected !!