इगतपुरी मतदार संघात महिला, युवा, मॉडेल व दिव्यांग विशेष संचलित केंद्र सज्ज : मी मतदान केले, आपणही करा – जेष्ठ मतदार चंद्रप्रभा भोपे

इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा निवडणुकीसाठी इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील २८९ मतदान केंद्रात आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.  मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी १ हजार ६६७ मतदान अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसही तैनात करण्यात आले आहे. या विधानसभा मतदारसंघात महिला, युवा, मॉडेल व दिव्यांग विशेष […]

इगतपुरी तालुक्यात लोकसभेसाठी शांतता आणि उत्साहात मतदान सुरु : मोडाळे येथे मतदान करणाऱ्या कुटुंबांना फळझाडांचे वाटप

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीसाठी उत्साहात आणि शांततेत मतदान सुरु झाले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत ४४ हजार ८८९ मतदारांनी आपला हक्क बजावला. १६.३८ टक्के मतदान झाले असून टक्केवारी वाढणार असल्याचा अंदाज आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, अपक्ष शांतिगिरी महाराज, वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर या उमेदवारांमध्ये […]

लोकसभा निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दल सज्ज : नागरिकांनी सुटी नव्हे ड्युटी समजुन मोठ्या संख्येने मतदान करावे – एसपी विक्रम देशमाने 

इगतपुरीनामा न्यूज –  निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुक प्रक्रिया देशभरात सुरू आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्रात शेवटच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुक प्रक्रिया नाशिक जिल्ह्यात पार पडत जात आहे. जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी व धुळे या तीन लोकसभा मतदारसंघा मतदान प्रक्रिया सोमवारी २० तारखेला पाचव्या टप्प्यात पार पडणार आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात १२ विधानसभा मतदारसंघाचा समावेश […]

शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा केल्याशिवाय राहणार नाही : ॲड. बाळासाहेब आंबेडकर : व्हीबीएचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारार्थ घोटीत सभा

इगतपुरीनामा न्यूज – शेतकऱ्यांनी हमी भावासाठी अनेक वेळा दिल्लीत आंदोलने केली. सरकारने नेहमी डोळेझाकपणा करून हमीभावाचा कायदा केला नाही. हा कायदा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. उद्याची लढाई जिंकायची, देशाला वाचवायचे असेल तर भाजपला सत्तेतून उखडून टाका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घोटीत केले. नाशिक लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी […]

सैनिक समाज पार्टीच्या उमेदवार जयश्री महेंद्र पाटील यांना माजी सैनिकांचा पाठिंबा

इगतपुरीनामा न्यूज – खासदार सैनिक होऊ शकत नाही परंतु एक सैनिक खासदार होऊन देशाची सेवा नक्कीच करू शकतो. जनतेचे विविध प्रश्न, समस्या सोडवू शकतो. अधिकाधिक मते देऊन मला सेवेची संधी द्यावी असे आवाहन नाशिक मतदारसंघातील सैनिक समाज पार्टीच्या उमेदवार जयश्री महेंद्र पाटील यांनी केले आहे. देशासाठी जीवाची बाजी लावून सैनिक लढतात, त्याकामी त्यांच्या कुटुंबाचेही तितकेच […]

लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निर्भयपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम्

इगतपुरीनामा न्यूज – दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघात सोमवारी २० मे रोजी मतदान होत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. लोकशाही बळकट करण्यासाठी, निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् […]

महाविकासचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना भारतीय अस्मिता पार्टीचे उमेदवार ॲड. यशवंत पारधी यांचा जाहीर पाठिंबा

इगतपुरीनामा न्यूज – भारतीय अस्मिता पार्टीचे उमेदवार ॲड. यशवंत पारधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडी शिवसेना उबाठाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला आहे. ॲड. उद्धव रोंगटे, संदीप गंभीरे, अनिल निसरड, राजाराम कोरडे, दत्तू बांबळे, तुषार नवाळे, मारुती गंभीरे यावेळी हजर होते. यशवंत पारधी हे एक उच्चशिक्षित असून शिक्षण, […]

मतदारांच्या मदतीला निवडणूक आयोगाचे ‘ॲप्स’

 लेखन – वृषाली पाटील, माहिती अधिकारी, कोल्हापूर सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सशक्त लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रिया महत्वाची आहे. निवडणुक प्रक्रियेमध्ये मतदार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मतदारांना निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यासाठी तसेच त्यांना विनासायास मतदान करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांच्या मदतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित विविध सोयी सुविधा व “ॲप्स” […]

नाशिक लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी लढवणार निवडणूक ?

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट या पक्षात नाशिक लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा वाढला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी उमेदवारी करणार नसल्याची घोषणा करून राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचे सांगितले होते. यातच पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना […]

राजाभाऊ वाजे यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ : पदाधिकारी आणि कार्यकर्ते विजयासाठी “मशाल” घेऊन सरसावले

भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज  : नाशिक लोकसभा मतदार संघातील विजयी उमेदवाराला निर्णायक मतांची आघाडी देणारा इगतपुरी विधानसभा मतदार संघ असल्याचा इतिहास आहे. टाकेद जिल्हा परिषद गट सिन्नर विधानसभा मतदार संघाला तर त्र्यंबकेश्वर तालुका इगतपुरीला जोडलेला आहे. त्यातच त्र्यंबकेश्वर तालुक्यातही भौगोलिक दृष्ट्या दोन भाग निर्माण झालेले आहेत. विविध आदिवासी जमातींचे प्राबल्य, मराठा बांधव, दलित, मुस्लिम […]

error: Content is protected !!