
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. यामुळे राजकीय पक्ष प्रवेशाच्या घटना वाढत आहेत. ह्या पक्षांतराचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुद्धा बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अल्पसंख्यांक नेत्या शेख सईदा इसाक यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे नेते नेते लकीभाऊ जाधव, आकाश पारख, महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार शुभांगी यशवंत दळवी, माजी नगरसेवक यशवंत दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी पक्षांतर केले. याप्रसंगी काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे इगतपुरी तालुका तालुकाध्यक्ष बिलाल अजीज सैय्यद, शहराध्यक्ष अरबाज याकुब खान, शेख शाहनवाज उपस्थित होते.