प्रभागाच्या उर्जस्वल तरुणाईची भूषण जाधव यांना लाभतेय साथ : माता माऊल्यांचा आशीर्वाद आणि सामान्य जनतेच्या वाढत्या विश्वासाने विजय पक्का 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी आणि प्रभाग ४ मधील तरुणांनी भूषण जाधव यांना नेता म्हणून नव्हे तर आपल्या हक्काचा माणूस म्हणून स्वीकारले आहे. आजची पिढी त्याच्यात नवे नेतृत्व, प्रामाणिक दृष्टी आणि धाडसी निर्णयक्षमता पाहते. प्रभागातील माता मातृशक्ती त्याला स्वतःचा मुलगा मानून आशीर्वाद देतात. हीच खरी संपत्ती आहे जी कोणत्याही राजकारण्याला मोठी ताकद देते. यामुळेच भूषण जाधव हा उमदा युवक प्रभाग ४ मधून इगतपुरी नगरपरिषदेचा युवा नगरसेवक झालेला आपल्याला दिसणार आहे. सेवाभावी कार्य म्हणजे काय याची साक्षात प्रचिती देणाऱ्या भूषण जाधवच्या कार्याला रोखण्यासाठी राजकारण्यांनी ऐनवेळी दगाफटका केला. पण जनतेचा आवाज बनलेला भूषण जाधव नव्या ताकदीने अन खंबीरपणाने प्रभाग ४ च्या लोकांसाठी पांडुरंगासारखा उभाच राहिलेला दिसतो. गोरगरिबांसाठी तत्पर असलेला भूषण जाधव ‘गळ्यातला ताईत’ बनून लोकांच्या सेवेच्या कार्याला आपलं ध्येय ठरवून बसलाय. भूषण जाधव हा केवळ नेता नाहीतर तो असंख्य गरजवंतांच्या गळ्यातील ताईत आहे. 

आजारी वृद्धांच्या उपचारांसाठी मदत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य, तरुणांना रोजगार मार्गदर्शन, महिलांसाठी स्वावलंबन उपक्रम, शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण अशा अनेक क्षेत्रांत त्याने स्वतःहून पुढाकार घेत लोकांना साथ दिली आहे. त्याचे कार्य खूपच बोलके आहे, म्हणूनच लोक त्याला मनापासून प्रेम करतात. प्रभाग ४ मधील ह्या ‘उगवत्या सूर्या’ला भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन चक्क नागरिकच करायला लागलेत. समाजकारणाचा पाया, प्रामाणिकतेची शिदोरी, तरुणाईची उर्मी आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन भूषण जाधव आज विकासाच्या नवीन युगाकडे अनेकांना ठिकाणावर आणण्यासाठी विजयी वाटचाल करत आहे. प्रभाग ४ चा विकास हा भूषण जाधवचा संकल्प असून फक्त निवडणुकीचा मुद्दा नाही. भूषण जाधवला तुमचे मत म्हणजे इगतपुरीच्या उज्ज्वल भविष्य, प्रामाणिक नेतृत्वाची निवड, समाजकारणाला दिलेला मान अन विकासाच्या नवीन पहाटेची सुरुवात आहे. प्रभाग ४ मधून विजयी मतदान फक्त भूषण जाधवलाच होईल. म्हणून भूषण जाधव यांचा विजय पाहण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत.

error: Content is protected !!