विरोधकांना फुटला घाम ; शिवसेना उबाठा व काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत प्रवेश ; प्रचार कार्यालयाचेही झाले उदघाटन 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत इगतपुरी शहरातील शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (अप), रिपब्लिकन सेना एकत्र आल्याने विरोधकांना घाम फुटला आहे.थेट नगराध्यक्षापदासाठी सौ. शालिनी संजय खातळे आणि नगरसेवकपदांचे दिलेले उमेदवार निश्चितपणे निवडून येणारच आहेत. इगतपुरी शहराच्या परिवर्तनाची दशा व दिशा ठरवणारे नेतृत्व एकत्र आल्याने मतदार नागरिकांनी या आघाडीला एकमताने एकमुखी पसंती दिली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना. दादासाहेब भुसे, जिल्हा नेते अजय बोरस्ते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे इगतपुरीत दिमाखदार उदघाटन करण्यात आले. यावेळी इगतपुरी शहरातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी व माजी नगरसेवक यांनी शिवसेना शिंदे पक्षात पक्षप्रवेश केले. यामध्ये शिवसेना उबाठाच्या माजी नगरसेविका शोभा भराडे, महिला आघाडीच्या सायली शिंदे, उस्मान खान, रशिद भाई खान, अभय पार्टे, हेमंत पार्टे, इंदिरा कॉंग्रेसचे नगरसेवक धनराज शर्मा, माजी नगरसेवक शोभराज शर्मा यांचा समावेश आहे.

error: Content is protected !!