
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे पक्षाच्या धनुष्यबाण निशाणीवर सौ. शालिनीताई संजय खातळे या उभ्या आहेत. त्या सक्षम नगराध्यक्ष म्हणून शहराच्या शाश्वत प्रगतीसाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरून निश्चितच विजयी होणार आहेत. त्यांच्याकडे काही विशिष्ट गुण आणि क्षमता असल्याने त्या सक्षम नगराध्यक्षा म्हणून सर्वांगीण बाजूने पात्र ठरतात. खातळे कुटुंबात सबळ राजकीय वारसा आणि संपूर्ण शहरभर जनसंपर्क यामुळे शालिनीताई यांना राजकारण आणि जनसेवा यांचा परिपाठ अवगत आहे. पती संजय खातळे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. त्यामुळेच इगतपुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रियपणे झटणारी महिला म्हणून शालिनीताई संजय खातळे यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली गेलेली आहे.
शालिनीताई खातळे यांच्याकडे शहराच्या भविष्याबद्दल स्पष्ट दृष्टी आणि नियोजन असून पुढील अनेक वर्षांचे नियोजन करण्याची क्षमता आहे. प्रशासनात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा आणून निधीचा योग्य वापर आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याची क्षमता शालिनीताई खातळे यांच्यात आहेत. सर्वांना सोबत घेऊन, योग्य वेळी कठोर आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचे नेतृत्व कौशल्य, नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्याशी थेट संवाद साधणे, नागरिकांच्या सूचना आणि तक्रारींकडे लक्ष देऊन त्यावर उपाययोजना यासाठीही त्या भक्कमपणे समर्थ आहेत. इगतपुरी शहराच्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सुद्धा शालिनीताई संजय खातळे ह्या इगतपुरीकरांसाठी महत्वाच्या आहेत. म्हणून इगतपुरीच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाला पहिली पसंती लाभत आहे. शिवसेना शिंदे पक्षाची धनुष्यबाण निशाणी घेऊन त्या मैदानात उतरलेल्या आहेत.