डॉ. शरद तळपाडे यांना वाडीवऱ्हे गटात वाढता पाठिंबा : सेवाभावी कार्यामुळे जिल्हा परिषद गटात लाभतेय विश्वासार्हता 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील महत्वाच्या वाडीवऱ्हे गटात भारतीय जनता पक्षाचे संभाव्य उमेदवार डॉ. शरद तळपाडे यांची विश्वासार्हता अधिक वाढली आहे. तभारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीचे बॅनर गटात ठिकठिकाणी लावले असुन त्यांच्या निवडणूकपूर्व प्रचाराची घोडदौड वेगाने सुरू आहे. गटातील प्रलंबित प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी केंद्रात व राज्यात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडुनच विकास शक्य असल्याची लोकभावना आहे. त्यामुळे डॉ. शरद तळपाडे यांना याचा मोठा फायदा होण्याचे संकेत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे महाराष्ट्रातील पक्षालाही नवचैतन्य आल्याचे पहायला मिळत आहे. इतर पक्षांमधून उमेदवारांची संख्या अधिक आहे. भारतीय जनता पक्षाने डॉ. शरद तळपाडे यांना उमेदवारीसाठी सिग्नल देऊन तयारीचे आदेश दिलेले आहे. ते भाजपाचे वाडीवऱ्हे गटासाठी एकमेव इच्छुक उमेदवार असल्याने त्यांच्यासह कार्यकर्त्यांच्या आशाही पल्लवित झाल्याचे पहायला मिळत आहे. एवढेच नाही तर याबाबत पक्षाच्यावतीने घेतलेल्या आढाव्यातही त्यांची सरशी असल्याचे सांगितले जाते. यामुळे डॉ. शरद तळपाडे जोमात आले असुन त्यादृष्टीने त्यांनी गटातील दौऱ्यांचा वेगही वाढवला आहे. इतर पक्षांच्या इच्छुकांची संख्या अधिक असल्याने ऐनवेळी डावलले गेल्यास इच्छांवर पाणी फिरेल म्हणून इतर नाराज इच्छूक बंडाचा झेंडा हाती घेतील. यामुळे मोठी विभागणी होऊनही त्याचा फायदाही डॉ. शरद तळपाडे यांना होऊ शकतो असा अंदाज कार्यकर्त्यांमधून लावला जात आहे. त्यादृष्टीने त्यांची घोडदौडही वाढली आहे. एकंदरीतच भारतीय जनता पक्षाने वाडीवऱ्हे गटावर पक्षाचा एकमेव उमेदवार कामाला लावल्याने याचाही फायदा उमेदवार व पक्षाला होण्याचे संकेत आहेत.

error: Content is protected !!