भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील थेट सरपंचपदांसाठी यापूर्वी काढलेले आरक्षण २०२० पासून ३१ मार्च २०२५ या कालावधीसाठी लागू आहे. मात्र आरक्षणाची टक्केवारी न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदलली जाणार आहे. यासाठी इगतपुरी तहसीलदार कार्यालयात ९ जुलैला दुपारी बारा वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. अनुसूचित क्षेत्रातील सरपंच आरक्षण जवळपास जैसे थे असणार […]
इगतपुरीनामा न्यूज – लोकसभेच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्यानंतर काँग्रेसने आता आपला मोर्चा विधानसभेच्या निवडणुकीकडे वळवला आहे. म्हणून महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष व युवा वर्गात लोकप्रिय असलेले उदयोन्मुख नेतृत्व लकी जाधव यांच्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर मतदार संघ पिंजून मतदार संघातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून त्यांचे […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – राज्याच्या विविध भागात ज्यांच्या पुण्याईने आणि आशीर्वादाने हजारो कुटुंबांत चूल पेटते असे दैदीप्यमान व्यक्तिमत्व म्हणजे इगतपुरी तालुक्याचे भूमिपुत्र स्व. लोकनेते गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे. आईवडील आणि देवांच्या सोबत स्व. दादासाहेबांची प्रतिमा अनेक घरात पूजली जाते, कारण त्या त्या लोकांसाठी ते देवस्वरूप होते. राजकारण आणि पक्ष न पाहता अनेकांची […]
भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज – अपेक्षेप्रमाणे नाशिक लोकसभा मतदार संघातील जनतेने दिलेला कौल महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या बाजूने झुकणारा आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघातील जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात अधिकाधिक मतांचे दान टाकल्याचे दिसते. इंदिरा काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार तथा शिवसेना उपनेत्या निर्मला गावित यांचे मतदारसंघात सत्तास्थान भक्कम करणारा […]
इगतपुरीनामा न्यूज – लोकशाही बळकटीसाठी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. ह्या कर्तव्याची जाणीव ठेवून नागरिकांनी मतदान करणे काळाची गरज आहे. हे सिद्ध करीत स्त्री शक्ती महिला प्रभाग संघ वाकी बिटुर्ली येथील समता महिला ग्रामसंघाने मतदान जनजागृती अभियानात पुढाकार घेत मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाचे महत्व पटवून दिले. यात २१ गटांच्या महिलांनी सहभाग नोंदवून मतदार राजाचे […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघातील वायघोळ मतदार केंद्रात सायंकाळी ६ नंतरही किमान २५० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे आहेत. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर ही गर्दी असून आतापर्यंत ह्या केंद्रात ८०२ मतदान पार पडलेले आहे. १ हजार ३०० मतदार संख्या असलेल्या ह्या मतदान केंद्रात रात्री ९ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहील असा अंदाज […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील आदिवासी दुर्गम अतिदुर्गम भागातील मतदान केंद्रावर अभूतपूर्व उत्साहात मतदान सुरु आहे. अनेक केंद्रावर महिला आणि पुरुषांनी गर्दी केली असून शेवटच्या टप्प्यात मतदारांनी आपला हक्क बजावण्यासाठी गर्दी वाढवली आहे. एल्गार कष्टकरी संघटनेच्या सभासदांनी मतदान केंद्रावर सामुदायिकपणे एकाचवेळी जाऊन लोकशाहीच्या उत्सवात योगदान दिले. आदिवासी भागासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात झपाट्याने वाढलेला […]
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – लोकसभेच्या मतदानासाठी मुकणे येथे सकाळपासूनच मोठ्या रांगा लागल्या होत्या. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुकणे येथील आदर्श महिला ग्रामसंघाने जनजागृती अभियान राबवले. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क व कर्तव्य असुन देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करणे आवश्यक असल्याचे मतदान जनजागृती अभियानातून संबोधित केले. आदर्श संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा […]
इगतपुरीनामा न्यूज – लोकशाहीचा उत्सव म्हणून सगळीकडे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे महत्व देण्यात आले आहे. त्यानुसार मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन आणि जागरूक नागरिक प्रयत्न करीत आहेत. मात्र इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील २ पैकी एका मतदान केंद्रावर ढिसाळ कारभाराचा फटका मतदारांना आणि केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना बसतो आहे. येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या एकतर्फी कारभारामुळे अनेक महिला आणि पुरुष […]
इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा निवडणुकीसाठी इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील २८९ मतदान केंद्रात आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी १ हजार ६६७ मतदान अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसही तैनात करण्यात आले आहे. या विधानसभा मतदारसंघात महिला, युवा, मॉडेल व दिव्यांग विशेष […]