नाशिक, मुंबई, पुणे सुवर्णत्रिकोण साधणारी इगतपुरी विकासाची इंद्रपुरी करण्यासाठी आमचा लढा – सौ. शालिनी संजय खातळे : नगराध्यक्ष आणि सर्व जागांवरील आमचे नगरसेवक निवडून येतील – संजय खातळे 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा दृढ संकल्प, स्वच्छतेचा आदर्श निर्माण करणारे शहर, तळागाळातील घटकांना केंद्रबिंदू मानून शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम आणि इगतपुरीकर नागरिकांना आनंद वाटेल अशी सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी करीत आहे. प्रत्येक प्रभागात समाजाच्या चांगुलपणासाठी झटणारे, गोरगरिबांचे कैवारी म्हणून काम करणारे आणि नीतिमत्ता संपन्न, चारित्र्यवान, शिलवान उमेदवार उभे केले आहेत. इगतपुरीचे मतदार बंधू भगिनी सुजाण आहेत. त्यामुळे आमचा विजय ही काळ्या दगडावरची न पुसणारी रेखा आहे असा ठाम विश्वास शिवसेना धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. शालिनीताई खातळे यांनी व्यक्त केला. नाशिक, मुंबई आणि पुणे असा सुवर्णत्रिकोण साधणारी इगतपुरी ही खऱ्या अर्थाने इंद्रपुरी म्हणून नावलौकिकाला पात्र ठरवण्यासाठी आम्ही ही निवडणूक हाती घेतली आहे. यापूर्वी ह्या शहराला अविकसित ठेवणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड निवडणुकीच्या मतदानात उमटणार आहे. यासाठी सर्व इगतपुरीकरांनी शिवसेना धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ यांचे सर्व अधिकृत उमेदवार निवडून द्यावेत असे आवाहन यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय खातळे यांनी केले. इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत आम्ही संपूर्ण ताकदीने उतरलो असून इगतपुरी शहराच्या पुढील ५० वर्षाच्या भविष्यासाठी मतदारांनी सुद्धा आमच्या हातात सत्तेच्या चाव्या देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण इगतपुरीला सुंदर आणि विकसित इंद्रपुरी करण्यास कटीबद्ध आहोत असेही सौ. शालिनी संजय खातळे यांनी सांगितले.

error: Content is protected !!