इगतपुरीनामा न्यूज – वर्षानुवर्षे गरिबीचे दाहक चटके सोसत सोसत उपेक्षित आदिवासी समाज, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी कायम मी लढत आलो आहे. सामान्य माणसाच्या वेदना, त्यांच्यावर होत असलेला अन्याय, रोजच्या जगण्यासाठी आटापिटा, चिंताजनक बेरोजगारी पाहून माझे डोळ्यातील अश्रू आता सुकून गेले आहेत. ह्याच सामान्य पिचलेल्या माणसाला मी गेली दहा पंधरा वर्ष आधार देऊन त्यांच्या हक्कासाठी रोज […]
इगतपुरीनामा न्यूज – दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम आणि इगतपुरी तालुका शाखा, मार्गदर्शक ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार व कार्याध्यक्ष भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार सर्व माजी श्रामनेर बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका सर्व तालुका पदाधिकारी, इगतपुरी शहर कार्यकारिणी, घोटी शहर शाखा, ग्रामशाखा, तळेगाव ग्रामशाखा, जानोरी, नांदगाव ग्रामशाखा […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रचारार्थ इगतपुरी येथे उद्या सकाळी ९ वाजता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महायुतीतील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९ वाजेपासून […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभेत जनसंवादी पक्षातर्फे उमेदवारी करून जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणार असल्याचा विश्वास जनसंवादी पक्षाचे उमेदवार अनिल दत्तात्रय गभाले यांनी त्र्यंबकेश्वर येथे व्यक्त केला. त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी अनिल गभाले यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. अनिल गभाले हे आदिवासी युवा नेतृत्व म्हणून प्रसिद्ध असून […]
इगतपुरीनामा न्यूज – इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील तरुणांची फौज रणधुमाळीत उतरली आहे. आपल्या पातळीवरून समक्ष, रॅली, सोशल मीडिया, गाठीभेटी, फोनद्वारे संवाद साधून मतदारांना लकीभाऊ जाधव यांना निवडून देण्याचे आवाहन केले जाते आहे. युवकांच्या प्रचारामुळे खऱ्या अर्थाने ‘जय जवान”चा नारा सार्थक झाल्याची भावना मतदारांनी व्यक्त केली. सोशल मीडियामुळे तरुण पिढी […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात आहेत. २ तालुक्यात ३०० मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर २ मतदान यंत्र लावले जाणार आहे. मतदान यंत्रावर म्हणजे एका बॅलेट युनिटवर एकूण १६ उमेदवारांची नावे समाविष्ट होतील, अशी रचना असते. त्यानुसार मतपत्रिका तयार केली जाते. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनंतर मतपत्रिकेवर वरीलपैकी कोणीही नाही (नोटा) हे […]
इगतपुरीनामा न्यूज – महायुती सरकारच्या लोकाभिमुख आणि विकासाच्या योजना, आमदार हिरामण खोसकर यांनी केलेली विकासकामे, तगडा जनसंपर्क आणि शिवसैनिकांची अफाट ताकद महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना दुसऱ्यांदा विधासभेत पाठवणार आहेत. तरीही शिवसैनिकांनी गाफिल नं रहाता जास्तीतजास्त मतांनी निर्णायक मतदान महायुतीला मिळण्यासाठी सक्रियतेने काम करावे, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आणि महायुतीचे स्वप्न करण्यासाठी जीवाचे रान […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघ लक्षणीय लढतीसाठी प्रसिद्ध आहे. माघारीनंतर १७ उमेदवारांचे भवितव्य मतदाराच्या हाती आले आहे. सर्वाधिक इच्छुक असणाऱ्या महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने लकीभाऊ जाधव यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे नाराज होऊन शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या माजी आमदार निर्मला गावित पदर खोचून अपक्ष उभ्या ठाकल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाची […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी अनुसूचित जमाती राखीव विधानसभा मतदारसंघात आता चांगलीच मजा येणार आहे. महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेसचे लकीभाऊ जाधव, महायुतीतील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर, मनसेतर्फे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, अपक्ष उमेदवार माजी आमदार निर्मला गावित, अपक्ष बाळासाहेब शिवराम झोले, वंचित बहुजन आघाडीचे भाऊराव डगळे, स्वराज्यचे डॉ. शरद तळपाडे यांच्यात आता […]
इगतपुरीनामा न्यूज – मला राजकारणाचे बाळकडू माझे वडील माजी आमदार शिवराम झोले यांच्याकडून मिळाले. त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेऊन स्थानिक भूमिपुत्र म्हणुन मला जनतेची सेवा करायची असून त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत मला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत असून जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहे. यंदाच्या निवडणुकीत आमची मोठी […]