ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा ॲथॅलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आणि व्ही डी के स्पोर्ट फाउंडेशनच्या सहकार्याने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात दोन दिवसीय सब ज्युनियर गटाच्या नाशिक जिल्हा ॲथॅलेटिक्स स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत ७, ८,१२, १४ आणि १६ वर्ष वयोगटातील मुले आणि मुली वयोगटाचा समावेश होता. यामध्ये त्र्यंबकराज ॲथॅलेटिक ग्रुपने आपला दबदबा कायम ठेवला. संचालक लोकेश कडलग यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रुपने उपविजेते पद मिळवले. ८ वर्षे आतील मुल ब्रॉड जम्प मध्ये श्रीधम काळे याला सिल्वर मेडल, प्रसाद मेढेपाटील याला ब्राँझ मेडल, मुली दिशा पटेल रिले मध्ये गोल्ड मेडल, गार्गी उगले लॉंग जंप ब्राँझ मेडल, १००मी व ५० मी गोल्डमेडल, रिले गोल्ड मेडल, १० वर्षे आतील मुले आदिनाथ चव्हाण गोल्ड मेडल, १२ वर्षे आतील मुले तेजस मेढेपाटील लांब उडी मध्ये गोल्ड मेडल, रनिंग मध्ये सिल्वर मेडल, कार्तिक गुंबाडे ब्राँझ मेडल प्राप्त झाले. १२ वर्षे आतील मुली अनन्या पटेल रिले मध्ये गोल्ड मेडल, ६०मी ब्राँझ मेडल, लाँग जम्प सिल्वर मेडल, सिया कडकग ३०० मी गोल्ड मेडल, ६०मी सिल्वर मेडल, उत्कृष्ट खेळाडू म्हणून चॅम्पियनशिप ट्रॉफी देण्यात आली. श्रीशा उगले ६० मी मध्ये गोल्ड मेडल, रिलेमध्ये गोल्डमेडल, लांब उडी मध्ये गोल्ड मेडल, १४ वर्षे आतील मुले गौरव भांगरे ८०मी सिल्व्हर मेडल, १४ वर्षे आतील मुली अनन्या राठी ३०० मी रनिंग, ८०मी रनिंग व रिलेमध्ये गोल्ड मेडल, उत्कृष्ट खेळाडू म्हणून चॅम्पियन शिप ट्रॉफी मिळाली. ६०मी रनिंगमध्ये प्रथमेश गांगुर्डे गोल्ड मेडल, रिले मध्ये मुली सिया यादव, श्रवणी येडे, सोनाली चव्हाण,.कार्तिकी सुतार यांना ब्रॉन्झ मेडल, रिले मध्ये मुले गौरव भांगरे, वेदांत जिरेमाळी, स्वप्नराज कोरडे, वल्लभ बोराटे यांना ब्रॉंझ मेडल मिळाले. त्र्यंबकराज ॲथॅलेटिक ग्रुपने प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुपचा दबदबा कायम ठेवत उपविजेतेपदाचा मान मिळवला. सर्व खेळाडूंचे कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे या विविध गटांमध्ये खेळाडूंची नाशिक जिल्हा संघासाठी निवड करण्यात आली आहे. निवड झालेले खेळाडू फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्य पद स्पर्धेत पंढरपूर येथे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group