
इगतपुरीनामा न्यूज – २१ ऑगस्टला रात्रीच्या वेळी वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्धीत आहुर्ली रोडवर मुरंबी शिवारात शेल कंपनीच्या शांताई पेट्रोल पंपावर काळ्या बजाज पल्सरवरील आलेल्या दोन अज्ञात आरोपी पंपावरील कामगाराला कोयत्याने मारहाण करून पैशांची बॅग हिसकावुन जबरी चोरी करून पळुन गेले. याबाबत बाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाणे येथे गुरनं १८८/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या पथकाने सदर गुन्हयातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व फिर्यादी यांना विचारपुस करून यातील आरोपींनी परिधान केलेले कपडे, त्यांची देहबोली व बोलीभाषा, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल यावरून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली. त्यानुसार यातील गुन्हेगार हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती, त्यावरून तपासाची चक्रे फिरवुन पथकाने संशयित आरोपी दत्तु प्रकाश महाले, वय १९, रा. गणेशगाव, त्ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक याच्यासह एक विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळुन बजाज पल्सर मोटरसायकवर आहुर्ली रोडवरील शेल पंपावरील कामगारास कोयता मारून पैशांची बॅग हिसकावुन जबरी चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. ह्या गुन्ह्याच्या समांतर तपासात आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, त्यांच्या इतर साथीदारांनी यापूर्वी घोटी व हरसुल परिसरात अतिदुर्गम भागातील महिला बचत गटाचे कलेक्शन करणारे बँक कर्मचाऱ्यांच्या मोटर सायकलचा पाठलाग करून त्यांना मारहाण करून, महिलांचे गुंतवणुकीचे पैसे, मोबाईल फोन जबरीने लुटमार करून चोरी केलेली असल्याबाबत सांगितले आहे. त्यावरून पोलीस पथकाने आरोपीच साथीदार गणेश बाळू वाघ, वय २६, रा. आळवंड, ता. त्र्यंबकेश्वर याला देखील ताब्यात घेतले आहे. ह्या आरोपीला विश्वासात घेवुन चौकशी केली असता, त्याने त्याचे साथीदारांसह गतमहिन्यात वैतरणा डॅम नर्सरी परिसरात व फेब्रुवारी महिन्यात हरसुल परिसरातील घनशेत घाटात महिला बचत गटाचे गुंतवणुकीचे पैशांचे कलेक्शन करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या मोटरसायकलींचा पाठलाग करून, त्यांना रस्त्यात अडवुन मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल फोन लुटमार केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील मोटारसायकल हस्तगत करण्यात आली असून त्यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी वाडीवऱ्हे व घोटी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, सुदर्शन बोडके, पोलीस अंगलदार प्रविण काकड, संतोष दोंदे, रावसाहेब कांबळे, योगिता काकड, नवनाथ शिरोळे, मयुर कांगणे, विकास गिते, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, संदीप नागपुरे यांच्या पथकाने जबरी चोरीचे वरील ३ गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शबाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे ही कामगिरी यशस्वी झाली.