
इगतपुरीनामा न्यूज – २४ नोव्हेंबरला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भावराव काळु भुतांबरे, रा. अंबई यांच्या मोटारसायकलला कट मारण्याच्या कारणावरुन ज्ञानेश्वर जयवंत भालेराव, नागेश सुनिल भालेराव, संपत संतु भालेराव, प्रदिप राजाराम भालेराव, नाना मनोहर भालेराव, सुनिल बाबुराव भुतांबरे, अशोक मनोहर भालेराव, अभिषेक ज्ञानेश्वर भालेराव, सर्व रा. अंबई या सर्वांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी व हाताचापटीने मारहाण केली. वाईटसाईट शिवीगाळ करुन तुला जिवंत सोडणार नाही अशी दमदाटी केली म्हणून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात विशाल सनु लचके यांनी फिर्याद दिलेली आहे. नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. परंतु ह्या प्रकरणातील व्यक्तींना पोलीस प्रशासनाने कायदा दाखवलेला नाही. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अद्धल घडवण्यासाठी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशनचे पांडुरंग बाबा पारधी यांनी केली आहे.