पाणलोट कामांच्या माध्यमातुन वेळुंजेचा करणार सर्वांगीण विकास : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त “जयहिंद लोकचळवळ”ची संकल्पना

इगतपुरीनामा न्यूज – वेळुंजे येथे नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी गावकऱ्यांसोबत वाढदिवस साजरा केला. डॉ. सुधीर तांबे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधुन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. डॉ. तांबे हे “जयहिंद लोकचळवळ” या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून संस्थेमार्फत वेळुंजे गावचे ग्रामीण सहभागीय मूल्य अवलोकन, सामाजिक आर्थिक सर्वेक्षण, गटनियोजन करून गावातील मूलभूत समस्या समजून घेतल्या आहेत. गावाचा आराखडा तयार करून पाणलोट क्षेत्रासह उदा. शेती, आरोग्य, शिक्षण, महिला बचत गट, शेतकरी गट, बेरोजगारी, इतर सर्व प्रकारची कामे होणार आहेत. यासह गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कामाने गाव सुजलाम सुफलम करण्याची ठरविले आहे, शेतीवरच गावाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. शेती सुधारली तरच गावाचा शाश्वत विकास होऊ शकतो म्हणून माथा ते पायथा मृद संधारण काम व पावसाळ्यात वृक्षारोपण करणार असल्याची त्यांनी सांगितले.

नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर व पुर्ननिर्मिती करणे जमिनीची धूप थांबवणे, पावसाचे पाणी अडवून जागेवरच जिरवणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे, उत्पादन वाढीबरोबरच जमिनीचा पोत टिकवणे अशी उद्दिष्ट असल्याची त्यांनी सांगितले. भौगोलिकदृष्ट्या वेळुंजे गावाचे क्षेत्र पाणलोट क्षेत्रातील उपचारायोग्य असून त्याप्रमाणे उपचार झाल्यास भूजल पातळीत वाढ होऊन शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न उत्तरीत होऊ शकतो यातून गावाची आर्थिक स्थिती सुधारण्यात वाढ होईल. त्यामुळे लोकांचे स्थलांतराचे प्रमाण कमी होऊन गावाला योग्य पद्धतीने शिक्षण, आरोग्य व शेती सुविधांचा लाभ मिळू शकतो. मृद संधारण कामाबरोबर इतर कामे करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. गावाच्यावतीने माजी उपसरपंच समाधान बोडके यांनी चराईबंदी, कुऱ्हाड बंदी, नसबंदी, नशाबंदी, लोटाबंदी, बोरवेल बंदी, श्रमदान याबाबत सहकार्याची खात्री दिली. यावेळी सरपंच राधाबाई उघडे, उपसरपंच वैशाली काशीद, माजी उपसरपंच समाधान बोडके, सदस्य राम उघडे, माजी सरपंच गोपाळा उघडे, मुळेगावचे सरपंच अंकुश भस्मे, माजी सरपंच नामदेव सराई, नारायण हागोटे, वनविभागाचे मधुकर चव्हाण, कैलास महाले, संदीप बोडके, दिलीप बोडके, अनिल उघडे, संयुक्त महिला बचत गटाच्या अध्यक्षा स्वाती बोडके, जयहिंद लोकचळवळचे समन्वयक दशरथ वर्पे, व्यवस्थापक जे. एम. मैड आदी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!