इगतपुरी येथे तालुकास्तरीय बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथे तालुकास्तरीय बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रम घेण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी व विषय तज्ञ यांनी मार्गदर्शन केले. मासिक पाळी व स्वच्छता व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धक आणि विशेष उल्लेखनीय कामगिरी […]

संजीवनी आश्रम शाळेत धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण

इगतपुरी : वैयक्तिक आरोग्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्यावरही होतो. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे, आणि प्रत्येकाने ती काटेकोरपणे पार पाडली पाहिजे असे आवाहन मुख्याध्यापक मनोज गोसावी यांनी केले. तळेगाव येथील संजीवनी आश्रमशाळेत आज (दि. १८) धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण शिबीर घेण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आश्रमशाळेतील […]

अभिमानास्पद – घोटीच्या मातोश्री हॉस्पिटलने २२ वर्षीय युवतीला मृत्यूच्या जबड्यातून काढले बाहेर : साक्षात मृत्यूसुद्धा रुग्णाच्या विश्वासामुळे झाला पराजित

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या एका २२ वर्षीय आदिवासी युवतीला मृत्यूच्या जबड्यातून घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलने परत आणले आहे. मुंबई, नाशिकच्या नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या प्रकरणात हतबलता व्यक्त करून मोठ्या धोक्याची सूचना दिली होती. मात्र युवतीच्या नातेवाईकांचा मातोश्री हॉस्पिटलवरील पक्का विश्वास आणि […]

इगतपुरी तालुक्यासाठी सुसज्ज रुग्णवाहीका राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गोरख बोडके यांच्याकडे सुपूर्द : सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी होणार फायदा

इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांचे अथक प्रयत्न आणि लायन्स क्लब जुहू यांच्या सहकार्याने इगतपुरी तालुक्यासाठी सुसज्ज रुग्णवाहीका आज लोकार्पित करण्यात आली. मोडाळे येथे महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी सोपवली. ह्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातल्या तळागाळातील गोरगरीब नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा वेळेत मिळण्यास […]

व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी इगतपुरीत मनशांती व्यसनमुक्ती केंद्राचे उदघाटन : व्यसनी व्यक्तींवर होणार सर्वांगीण उपचार

इगतपुरीनामा न्यूज – कै. अण्णासाहेब नारायण पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित मनशांती व्यसनमुक्ती केंद्राचे इगतपुरी येथे उत्साहात उदघाटन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इगतपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज गोसावी होते. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखुंडे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष तथा सुनील रोकडे, प्रदेश उपाध्यक्ष मुन्ना गुप्ता, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल देसले, रेस्क्यू […]

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत वाडीवऱ्हे येथे इगतपुरी गटास्तरीय स्वच्छता रन उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत वाडीवऱ्हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद नाशिक पाणी व स्वच्छता विभाग, पंचायत समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता रन, महिला रॅली व लेझीम पथक रॅली काढण्यात आली. ह्या कार्यक्रमाचे उदघाटन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन हिरामण खोसकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व ) दिपक पाटील यांनी केले. वाडीवऱ्हे […]

तणावांपासून मुक्तीसाठी प. पू. आनंदमूर्ति गुरुमाँ परिवारातर्फे १७ सप्टेंबरला नाशिक येथे योगनिद्राचे विशेष सत्र

इगतपुरीनामा न्यूज – परमपूज्य आनंदमूर्ति गुरुमाँ भक्तपरिवार आयोजित नाशिक येथे १७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता शंकराचार्य संकुल, जुना गंगापूर नाका येथे योगनिद्रा सत्र होणार आहे. मानसिक तणाव हा सगळ्यांनाच असून अनेक लोक तणावात जीवन जगत आहेत. याचे दुष्परिणाम भयंकर आहेत. मनुष्य बऱ्याच वेळा तो तणावात नाही असे समजत असला तरी तो तणावात असतो. त्याचे दुष्परिणाम […]

रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी आणि नाशिक सिटीतर्फे भगतवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी व रोटरी क्लब ऑफ नाशिक सिटी यांच्याकडून मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. टच वूड फाउंडेशन यांनी ह्या आरोग्य शिबीरासाठी विशेष सहकार्य केले. इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो भगतवाडी येथील ब्लीस हॉटेल येथे नांदगावसदो परिसराच्या २० गावातील सर्व ग्रामस्थांसाठी हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी […]

इगतपुरी तालुका कृषी विभागातर्फे बारशिंगवे, वासाळी येथे पौष्टिक तृणधान्याबाबत जागृती अभियान

इगतपुरीनामा न्यूज – शालेय विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करून आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवावी असे प्रतिपादन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले. तालुका कृषी अधिकारी कार्यालय इगतपुरी यांच्यामार्फत तालुक्यातील विविध शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याविषयी जागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बारशिंगवे, वासाळी येथील शाळेत झालेल्या कार्यक्रमात ते […]

डॉ. देविदास जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त भगवती हॉस्पिटल आणि AS पॅथॉलॉजी लॅबतर्फे विविध सामाजिक उपक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील भगवती हॉस्पिटलच्या संचालकपदाच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देणारे नामांकित डॉक्टर देविदास जोशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम संपन्न झाले. वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तातील साखर तपासणी व  रक्तगट चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १०२ लोकांच्या रक्तगट तपासण्या झाल्या. यावेळी ४४ जणांच्या साखर तपासण्या करण्यात आल्या. शालेय विद्यार्थ्यांसाठी […]

error: Content is protected !!