
इगतपुरीनामा न्यूज – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत गावांचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत, ग्रामपंचायतींना सक्षम करणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, गावांचा शाश्वत विकास साधणे यांसारख्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यानुसार इगतपुरी तालुक्यातील भावली खुर्द आयएसओ ग्रामपंचायत कार्यालयात विविध उपक्रम सुरु आहेत. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, प्रल्हाद ओंकारवती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आहे महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. महिलांची ॲनिमिया तपासणी करून त्यांना तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत मार्फत आयुष्यमान गोल्डन कार्ड, ई श्रमकर्ड, जॉबकार्ड, केवायसी, नवीन बचतगट स्थापन करणे, पोस्टाचा विमा काढणे, नवीन मतदार नोंदणी करणे, मेरी पंचायत अँप व निर्णय अँप डाउनलोड करणे इत्यादी सेवा देण्यात आल्या.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी रूपाली जाधव यांनी सांगितले की, सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, योजनांचे अभिसरण, संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान यावर आम्ही ताकदीने काम करणार आहोत. याप्रसंगी फाउंडेशनच्या मनुश्री मुखर्जी, डॉ. देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाविस्कर, डॉ. आश्का शेख, आरोग्यसेवक त्र्यंबक मेंगाळ, ज्योती जाधव, पोस्टमास्तर बाविस्कर मॅडम, मुख्याध्यापक सूर्यवंशी, गोल्डन कार्डचे ऑपरेटर शिवराज चौधरी, मतदार नोंदणीसाठी चंद्रकांत आगिवले, गांगुर्डे, जॉबकार्ड नोंदणीसाठी एकनाथ भगत व ऑपरेटर विनायक तेलम, आशा कार्यकर्ती हिरा झुगरे, धोंडाताई आगिवले यांनी काम पाहिले. गोकुळ आगिवले, यशवंत झुगरे, बबन आगिवले, सायजाबाई उबाळे, लक्ष्मीबाई तेलम, बेबीताई तेलम आदी उपस्थित होते.