आठवणींना उजाळा देत गोंदे दुमालाच्या विद्यार्थ्यांची २५ वर्षांनी भरली शाळा

इगतपुरीनामा न्यूज – पाथर्डी फाटा येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये गोंदे दुमाला येथील १९९७-९८ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आठवणींना उजाळा दिला. तब्बल २५ वर्षांनी त्यांची  शाळा भरल्याने त्यांनी आनंद व्यक्त करीत अधिक स्नेहबंध घट्ट केले. यावेळी तत्कालीन शिक्षकांनी सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या शाळेची विद्यार्थ्यांची पहिली यशस्वी बॅच दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर गेली पंचवीस […]

‘माँ जिजाऊ’ सारख्या माता जन्माला आल्या तरच ‘शिवबा’ निर्माण होतील – सुप्रसिद्ध गीतकार प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे : केपीजी महाविद्यालयात स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – विद्यार्थी आणि महाविद्यालये नव्या भारतासाठी प्रेरणास्रोत आहेत. समस्यांचा बाऊ न करता यश मिळेपर्यंत लढायला शिका. आईवडील गुरुजनांचे स्वप्न साकार करण्यासाठी कामाला लागा. यासह मुलींमध्ये महापुरुष जन्माला घालण्याची क्षमता आहे. माँ जिजाऊ सारख्या माता जन्माला आल्या तरच शिवबांसारखे महापुरुष जन्माला येतील असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गीतकार, गायक , समाजप्रबोधनकार प्रा. डाॅ. गणेश चंदनशिवे यांनी […]

नाशिप्र मंडळ संचलित इगतपुरी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न : प्रा. संजय शेलार, प्रा. पंकज देसाई, ॲड. मयूर जाधव यांनी केले मार्गदर्शन

इगतपुरीनामा न्यूज – पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ व नाशिप्र मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब जयकर तीन दिवसीय व्याख्यानमाला संपन्न झाली. केंद्र कार्यवाह प्रा. कांतीलाल दुनबळे यांनी प्रास्ताविक केले. पहिल्या विचार पुष्पात प्रा. संजय शेलार यांनी ‘भारतातील शैक्षणिक स्थित्यंतर आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. […]

ऊर्जा ग्रुपच्या साहाय्याने गावठा जिल्हा परिषद शाळेत विविध कामांचे उदघाटन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गावठा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुंबई येथील ऊर्जा ग्रुपकडून विविध कामे पूर्ण करण्यात आली. राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी ह्या शाळेत वर्गखोली व व्हरांडा फरशीकाम, नवीन ध्वजस्तंभ, रंगमंच, पाण्याची टाकी, ओटा यांची दुरुस्ती, फरशीकाम, मुलामुलींचे स्वच्छतागृह दुरुस्ती, लाईट फिटिंग दुरुस्ती, नळ फिटिंग दुरुस्ती, खिडक्या वेल्डिंग काम, स्वच्छता गृहाकडे जाणारा […]

आत्मनिर्भरतेसाठी विद्यार्थ्यांनी क्षमता ओळखून व्यवसायांची कास धरावी – सत्यवती गुंजाळ : इगतपुरी कला, वाणिज्य महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज – आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगामध्ये अर्थप्राप्तीसाठी केवळ नोकरीवर विसंबून न राहता त्याला पूरक व्यवसायाची जोड द्यावी. विविध व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखावी. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी यशस्वी झालेल्या उद्योजकांचे योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. सूक्ष्म अभ्यास करून सहज करता येणारे शेकडो व्यवसाय नव उद्योजकांची वाट पाहत असल्याने संधीचे सोने […]

ध्येयवेडे होऊन प्रयत्न केल्यास यशाचा मार्ग हमखास सापडणार – पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर : नाशिप्रच्या इगतपुरी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अविरत प्रयत्न, प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा, त्यांचा अभ्यासक्रम, मुलाखत व निवडपद्धती याविषयी सविस्तर माहिती गरजेची आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त आहे याला ग्रामीण तरुणांचा प्रामाणिकपणा व […]

जि. प. अध्यक्ष चषक तालुकास्तरीय स्पर्धेत पेहेरेवाडी शाळेचे घवघवीत यश

इगतपुरीनामा न्यूज – मानवेढे येथे झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पेहरेवाडी शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. धावण्याच्या स्पर्धेत   पेहेरेवाडीचा खेळाडू विशाल शिद याने ४०० मीटर धावणे स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम दोन सामने एकहाती जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली. अटीतटीची लढत होऊन अंतिम सामना पेहेरेवाडीने तीन गुणांनी […]

रोटरीच्या मदतीची चाके‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेतील – गोरख बोडके : रोटरी क्लब हिलसिटीतर्फे ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना सायकली वाटप

इगतपुरीनामा न्यूज – ग्रामीण भागात अनेक गरीब आदिवासी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या घरातील विद्यार्थ्यांना पायी धडपड‎ करीत शाळा गाठावी लागते.‎ काहींना तर घरचे थोडे फार कामही‎ करावे लागते. यासह नियमित सायकल चालवून शरीर संपदाही चांगली राहू शकते. म्हणून आज रोटरी क्लबच्या वतीने शिरसाठे गावातील ८ ते १० इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या. यावेळी […]

संजीवनी आश्रम शाळेत धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण

इगतपुरी : वैयक्तिक आरोग्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्यावरही होतो. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे, आणि प्रत्येकाने ती काटेकोरपणे पार पाडली पाहिजे असे आवाहन मुख्याध्यापक मनोज गोसावी यांनी केले. तळेगाव येथील संजीवनी आश्रमशाळेत आज (दि. १८) धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण शिबीर घेण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आश्रमशाळेतील […]

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी शाखेचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी शाखेचा मेळावा, गुणगौरव समारंभ, दिनदर्शिका प्रकाशन सोहळा गोंदे दुमाला येथे संपन्न झाला. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, मविप्र संचालक ॲड. संदीप गुळवे, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, बागलाणच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक निबंधक शिवाली सांगळे, शिक्षक संघाचे जिल्हा […]

error: Content is protected !!