इगतपुरी त्र्यंबक तालुक्यात शांततेत मतदान सुरु ; मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील

गोंदे दुमाला येथे मतदानासाठी आलेले मतदार

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघात उत्साहाच्या वातावरणात मतदान सुरु आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन आणि उमेदवार प्रयत्न करीत आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर, निवासी नायब तहसीलदार अनिल मालुंजकर, निवडणूक नायब तहसीलदार वर्षा वाघ आदी अधिकारी मतदान केंद्राना भेटी देत आहेत. मतदारांना आणि कर्मचाऱ्यांना अडचणी आल्यास तातडीने व्यवस्थापन केले जात आहे. पाणी, सावली, पाळणाघर, मतदार मदत केंद्र आदी सुविधामुळे मतदानाची संख्या वाढणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीवेळी मतदान केंद्रावर रांगा वाढल्याने यावेळी केंद्र विभाजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणात आली आहे. तळेगाव केंद्रावर यंत्राबाबत अफवा पसरली होती, तिचे निवारण करण्यात आलेले आहे. अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी नियमांचा बाऊ करत असल्याने मतदार नाराजी व्यक्त करत आहेत. आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सक्रियतेने काम करीत असल्याने मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे. केंद्राच्या १०० मीटर बाहेरच मोबाईल ठेवावा लागत असल्याने युवावर्ग नाराजी व्यक्त करीत आहे. अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठी प्रशासन आणि जागरूक नागरिक प्रयत्नशील असल्याचे दिसते.

काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Similar Posts

error: Content is protected !!