इगतपुरीनामा न्यूज – राज्यभरात आज एकाच वेळी विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेसाठी मतदारांची संख्या वाढली आहे, ही सकारात्मक बाब असली तरी मतदार संख्या वाढल्याच्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी सुध्दा वाढायला हवी अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात ३०० मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रातून २ लाख ८० हजार ५५९ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवक मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या वाढलेल्या आकड्यांचे रूपांतर मतदानाची टक्केवारी वाढण्यात व्हावे अशी अपेक्षा प्रशासकीय यंत्रणा बाळगून आहे. आपल्या हक्काबाबत आपण जसे जागरूक असतो तसेच आपल्या कर्तव्याबाबतही जागरूक असले पाहिजे. आणि मतदान हे प्रत्येक भारतीय मतदाराचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट गाठून एक नवा विक्रम प्रस्थापित करावा असे आवाहन प्रशासनाबरोबरच “इगतपुरीनामा”कडूनही करण्यात येत आहे. 1. काशिनाथ दगडू मेंगाळ पक्ष मनसे, चिन्ह रेल्वे इंजिन, 2. खोसकर हिरामण भिका पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, चिन्ह घड्याळ, 3. धनाजी अशोक टोपले पक्ष बसपा, चिन्ह हत्ती, 4. लकीभाऊ भिका जाधव पक्ष इंदिरा काँग्रेस, चिन्ह पंजा, 5. अनिल दत्तात्रय गभाले पक्ष जन जनवादी पार्टी, चिन्ह करवत, 6. अशोक वाळू गुंबाडे पक्ष पिझन्टस अँड वर्कस पार्टी, चिन्ह प्रेशर कुकर, 7. कांतीलाल किसन जाधव पक्ष भारत आदिवासी, चिन्ह पार्टी हॉकी आणि बॉल, 8. चंचल प्रभाकर बेंडकुळे पक्ष स्वाभिमानी, चिन्ह शिट्टी, 9. भाऊराव काशिनाथ डगळे पक्ष वंचित बहुजन आघाडी, चिन्ह गॅस सिलेंडर, 10. शरद मंगलदास तळपाडे पक्ष स्वराज्य, चिन्ह पेनाची निब सात किरणांसह, 11. कैलास सदू भांगरे अपक्ष, चिन्ह ट्रम्पेट, 12. गावित निर्मला रमेश अपक्ष, चिन्ह बादली, 13. जयप्रकाश शिवराम झोले अपक्ष, चिन्ह ऑटो रिक्षा, 14. बेबी ( ताई ) हरिचंद्र तेलम अपक्ष, चिन्ह खाट, 15. भगवान रामभाऊ मधे अपक्ष, चिन्ह बॅट, 16. शेंगाळ विकास मोहन अपक्ष, चिन्ह अंगठी, 17. शंकर दशरथ जाधव अपक्ष दूरदर्शन, 18. नोटा या सर्वांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात आज बंद होईल.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group