
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार धनाजी अशोक टोपले यांनी महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. आक्रमक पद्धतीने आदिवासी आणि सामान्य लोकांच्या विकासासाठी लकीभाऊ जाधव आणि धनाजी टोपले ह्या युवा नेतृत्वाची एकजूट झाली आहे. लकीभाऊ जाधव हे खरोखर अत्यंत गरीब घरातील असून त्यांच्या विरोधातील माजी आमदार यांना मतदारांनी संधी दिली, मात्र त्यांनी ठराविक लोक आणि स्वतःच्या तुंबड्या भरल्या. लकीभाऊ जाधव हे उमेदवार लोकांशी कायम जोडलेले असून त्यांना इगतपुरीतुन आमदार करावे यासाठी युवापिढी सक्रिय आहे.मी स्वतः व्यक्तिशः लक्ष घालून काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव यांना विजयी करण्यासाठी क्रियाशील आहे असे धनाजी टोपले यांनी कळवले आहे.