
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गावठा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुंबई येथील ऊर्जा ग्रुपकडून विविध कामे पूर्ण करण्यात आली. राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी ह्या शाळेत वर्गखोली व व्हरांडा फरशीकाम, नवीन ध्वजस्तंभ, रंगमंच, पाण्याची टाकी, ओटा यांची दुरुस्ती, फरशीकाम, मुलामुलींचे स्वच्छतागृह दुरुस्ती, लाईट फिटिंग दुरुस्ती, नळ फिटिंग दुरुस्ती, खिडक्या वेल्डिंग काम, स्वच्छता गृहाकडे जाणारा काँक्रीट रस्ता, सर्व इमारती आणि २ स्वच्छता गृहे, २ वर्गखोल्यांचे रंगकाम व स्वयंपाकगृह कामे पूर्ण झाल्याची माहिती दिली. ऊर्जा ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ह्या सर्व कामाचे उदघाटन संपन्न झाले. ऊर्जा ग्रुपतर्फे इगतपुरी तालुक्यात आजपर्यंत ५ शाळांना शाळा वर्ग खोली दुरुस्ती, शैक्षणिक साहित्य भेट मदत करून ऊर्जा मिळालेली आहे. यावेळी गावठा शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून उपस्थित सदस्यांची मने जिंकली. सूत्रसंचालन सतीश टेकूडे यांनी तर मुख्याध्यापक वैशाली गवारे यांनी आभार मानले. वैशाली गवारे, सायली भांगरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. ज्ञानेश्वर बांगर व प्रशांत बांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि गावकरी उपस्थिती होते.