आठवणींना उजाळा देत गोंदे दुमालाच्या विद्यार्थ्यांची २५ वर्षांनी भरली शाळा

इगतपुरीनामा न्यूज – पाथर्डी फाटा येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये गोंदे दुमाला येथील १९९७-९८ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आठवणींना उजाळा दिला. तब्बल २५ वर्षांनी त्यांची  शाळा भरल्याने त्यांनी आनंद व्यक्त करीत अधिक स्नेहबंध घट्ट केले. यावेळी तत्कालीन शिक्षकांनी सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या शाळेची विद्यार्थ्यांची पहिली यशस्वी बॅच दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर गेली पंचवीस वर्ष फारशे कुणीही एकमेकांच्या संपर्कात नव्हते. अनेकांना आपले स्नेहसंमेलन व्हावे ही गोष्ट मनात सारखी खटकत होती. हा मनातील विचार साजन नाठे यांनी बंडु नाठे, तानाजी नाठे, लालु नाठे , सुनिल विठोबा नाठे, नामदेव नाठे, सुनिल तुकाराम नाठे आदी वर्गमित्रांना बोलून दाखवला. त्यांनी सहमती दाखवल्यानंतर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम यशस्वी झाला. याप्रसंगी शिक्षक डी. एस. ठाकरे, पी. जे. देवरे, विजया पाटील, संजय पाखले, राजीव शेवाळे आदी शिक्षक उपस्थित होते. या शाळेतील सर्व विद्यार्थी उद्योजक झाले आहेत. न्यु इंग्लिश स्कुल विना अनुदानित शाळा होती. एवढे असूनही शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन आम्हाला संस्कारित केले असल्याचे साजन नाठे यांनी सांगितले. शिक्षकांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गणेश नाठे, साजन नाठे यांनी केले तर वसंत नाठे यांनी आभार मानले.

Similar Posts

error: Content is protected !!