नाशिप्र मंडळ संचलित इगतपुरी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न : प्रा. संजय शेलार, प्रा. पंकज देसाई, ॲड. मयूर जाधव यांनी केले मार्गदर्शन

इगतपुरीनामा न्यूज – पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ व नाशिप्र मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब जयकर तीन दिवसीय व्याख्यानमाला संपन्न झाली. केंद्र कार्यवाह प्रा. कांतीलाल दुनबळे यांनी प्रास्ताविक केले. पहिल्या विचार पुष्पात प्रा. संजय शेलार यांनी ‘भारतातील शैक्षणिक स्थित्यंतर आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ब्रिटिश कालीन शैक्षणिक धोरणापासून ते आत्ताचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पर्यंतची सखोल माहिती दिली. यावेळी प्राचार्या प्रतिभा हिरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रा. ललिता अहिरे यांनी सूत्रसंचालन, प्रा. माधुरी झाडे यांनी परिचय, प्रा. ज्योती सोनवणे यांनी आभार मानले. दुसऱ्या विचार पुष्पात प्रा. पंकज देसाई यांनी “संवाद यशाची गुरुकिल्ली” या विषयावर मार्गदर्शन करून समाजात वावरताना आपण संवाद कसा साधावा याची माहिती दिली. याप्रसंगी प्राचार्या प्रतिभा हिरे यांनी  स्वतःशी -स्वतःचा, पालकांशी -पाल्यांचा  व विद्यार्थ्यांचा -शिक्षकांशी संवाद कमी झाल्याची खंत व्यक्त केली. प्रा. ज्योती सोनवणे यांनी सूत्रसंचालन, प्रा. अविनाश कासार यांनी आभार मानले. ॲड. मयूर जाधव यांनी तिसऱ्या विचार पुष्पात “पराक्रमापलीकडील छत्रपती शिवराय” या विषयावर व्याख्यान दिले. छत्रपती शिवराय हे त्यांच्यानंतरच्या आणि आजच्या काळातही रयतेच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहेत. शिवाजी महाराज जागतिक पातळीवर पराक्रमापलीकडेही आदर्श राजे असल्याचे मार्गदर्शन केले. यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. भाग्यश्री मोरे यांनी आपले विचार मांडले. प्रा. शशिकांत सांगळे यांनी सूत्रसंचालन, प्रा. रवींद्र नाडेकर यांनी आभार मानले. व्याख्यानमालेसाठी समन्वयक डॉ. बाळू घुटे, प्रा. दिपाली तोटे, प्रा. जयश्री भालेराव यांचे सहकार्य लाभले. 

Similar Posts

error: Content is protected !!